सोलापूर, दि. ३- सोलापूरची कुलस्वामिनी श्री रूपाभवानी देवी मंदिरात ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मसरे कुटुंबीयांच्यावतीने घटस्थापना करून नवरात्रोत्सवास प्रारंभ करण्यात आला.
गुरुवारी यानिमित्त मंदिरात पहाटे चार वाजता प्रक्षाळ पूजा करण्यात आली. त्यानंतर सकाळी श्रीदेवीची नित्योपचारचार पूजा करून दुपारी सव्वा बाराच्या सुमारास मसरे कुटुंबीयांच्या वतीने घटस्थापना करण्यात आली.
यावेळी आमदार विजयकुमार देशमुख, मंदिराचे ट्रस्टी, वहिवाटदार व पुजारी मल्लिनाथ मसरे, सुनील मसरे, अनिल मसरे, मनीष मसरे, सारंग मसरे, प्रतीक मसरे, प्रकाश वाले, नागेश भोगडे यांच्यासह भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते. पहाटेपासून मंदिरात दर्शनासाठी भाविकांची मोठी रीघ होती.
दरवर्षी रात्री आठ वाजता महापूजा करून छबीना मिरवणूक काढण्यात आली. यावेळी भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.