सोलापूर प्रतिनिधी –
धर्म, संस्कृती, अध्यात्मास गतिशील चालना देण्यास वटवृक्ष देवस्थान अग्रेसर
श्री स्वामी समर्थांच्या दर्शनानंतर भागवत
यांचे भावोद्गार
अक्कलकोट,दि.२४ : श्री गुरु दत्तात्रयांचे अवतार सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज यांच्या पदस्पर्शाने अक्कलकोट भूमीसह संपूर्ण भारतातील अनेक प्रांत पावन झालेली आहेत, त्यामुळे श्री स्वामी समर्थांच्या नामाचा विस्तार संपूर्ण देशात आहे.
आज श्री स्वामी समर्थांचे मूळस्थान असलेल्या येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास प्रत्यक्ष भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेण्याचा योग आला. ब्रम्हांडनायक श्री स्वामी समर्थांच्या चरणी नतमस्तक होऊन स्वामींचे दर्शन घेतल्यामुळे आपण अत्यंत प्रभावीत झालो असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक मोहनजी भागवत यांनी व्यक्त केले. ते नुकतेच येथील श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानास भेट देऊन श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले. याप्रसंगी मंदिर समितीच्या वतीने समितीचे चेअरमन व नगरसेवक महेश इंगळे यांनी श्री स्वामी समर्थांच्या गाभारा मंडपात मोहनजी भागवत यांचा स्वामींचे कृपावस्त्र, प्रसाद, प्रतिमा, देऊन यथोचित सत्कार केला. याप्रसंगी मोहनजी भागवत बोलत होते. पुढे बोलताना भागवत यांनी श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान समितीचे चेअरमन महेश इंगळे यांच्या नेतृत्वाखाली श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानच्या अध्यात्मिक कार्याची दखल घ्यावी असेच कार्य आहे. धार्मिक व आध्यात्मिक क्षेत्रात कार्य करणाऱ्या देशभरातील मान्यवरांना श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे चेअरमन महेश इंगळे यांचे अत्यंत मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.
महेश इंगळे यांच्या नेतृत्वातून मंदिर समितीच्या या धार्मिक व आध्यात्मिक कार्याने संपूर्ण राष्ट्रात धर्म, संस्कृती, अध्यात्मास गतिशील चालना देण्यास श्री वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थान अग्रेसर असल्याचे मनोगतही भागवत यांनी याप्रसंगी व्यक्त केले. यावेळी महेश इंगळे यांच्या या कर्तृत्वाची दखल घेऊन आम्ही वाराणसीत जुलै २०२३ मध्ये संपन्न झालेल्या टेम्पल कनेक्टिव्हिटी समारंभास महेश इंगळे यांना आम्ही विशेष आमंत्रित केले असल्याच्या आठवणींनाही भागवत यांनी आवर्जून याप्रसंगी उजाळा दिला. या प्रसंगी प्रथमेश इंगळे यांच्या प्रमुख उपस्थितीसह गुरुवर्य मोहनराव पुजारी, मंदार महाराज पुजारी,
जिल्हा प्रचारक प्रशांत पांडकर, तालुका प्रचारक यश कुलकर्णी, तालुका कार्यवाह चेतन जाधव, तालुका संघचालक रवी जोशी, संतोष वगाले, मंदिर समितीचे सचिव आत्माराम घाटगे, विश्वस्त महेश गोगी, संपतराव शिंदे, श्रीशैल गवंडी, विपुल जाधव,
उत्तर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र टाकणे, गोपनीय खात्याचे धनराज शिंदे, दक्षिण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश स्वामी, गोपनीय खात्याचे गजानन शिंदे, शिवशरण अचलेर, बाळासाहेब एकबोटे, अमर पाटील, ऋषिकेश लोणारी, गिरीश पवार, श्रीकांत मलवे, सागर गोंडाळ, सुनील पवार, ज्ञानेश्वर भोसले, किरण साठे, स्वामीनाथ मुमूडले, महेश काटकर, महेश मस्कले, नागनाथ गुंजले आदिसह भाविक भक्त उपस्थित होते.
चौकट – महेश इंगळे यांच्या सुविद्य पत्नी कै.सौ.रुपाली इंगळे यांच्या निधनाची वार्ता समजून आपणांस मनस्वी अत्यंत दुःख झाले आहे. महेश इंगळे यांच्यासह इंगळे कुटूंबियांनी स्वामी समर्थांची प्रचंड सेवा केली आहे. श्री.स्वामी समर्थ महाराज महेश इंगळे यांना लवकरात लवकर या दुःखातून सावरण्याचे बळ द्यावे अशी स्वामीचरणी प्रार्थना करुन मोहनजी भागवत यांनी महेश इंगळे यांचे सांत्वन केले.
फोटो ओळ – श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतल्यानंतर मोहनजी भागवत यांचा वटवृक्ष मंदिरात सत्कार करताना महेश इंगळे, मंदार महाराज पुजारी, मोहनराव पुजारी, प्रथमेश इंगळे, आत्माराम घाटगे, महेश गोगी व अन्य दिसत आहेत.