सोलापूर प्रतिनिधी –
सोशल मीडियामुळे सापडल्या तीन महिन्यापासून हरवलेल्या वयोवृद्ध आजी
दीडशे किलोमीटर होऊन आले होते एक वयोवृद्ध आजी ही घटना बाळे येथे विनय क्लिनिक परिसरात जवळ अनेक वेळा हे वयोवृद्ध आजी बडबड करत फिरायची. हे माझ्या लक्षात येता. सोशल मीडियाचा वापर करून मी पोस्ट करण्यात आले हे पोस्ट अनेक ठिकाणी वायरल देखील झाले. या सोशल मीडियाच्या माध्यमातून 3 तीन महिने पासून हरवलेल्या आजी आज बाळे येथे सापडल्या आणि ते खरंसुडी गावचे ता. आटपाडी जिल्हा सांगली येथील त्यांच्या नातू सोबत या या वृद्ध आजी नातू सोबत गावी गेल्या.
आपल्या सारखी लोक समाजासाठी काम करतात म्हणून पोलिसांचा त्रास कमी होतो तुम्ही खूप चागल काम केलं आहे मी आपला आभारी आहे. अशी प्रतिक्रिया प्रशांत मागाडे आटपाडी पोलीस स्टेशनचे हवालदार यांनी व्यक्त केली.
चार ते पाच दिवसापासून वयोवृद्ध आजी बाळे येथे या परिसरामध्ये फिरत होते. फिरताना वयोवृद्धाची आजी माझ्या नजरेस पडले .मी त्यांना तात्काळ जेवण आणि सकाळी नाश्ताची व पिण्याचे पाण्याची देखील सोय केले. माझ्या या छोटासा प्रयत्न आजी परत त्यांच्या गावी सुखरूप पणे पोहोचले. ह्याचा मला खूप आनंद होत आहे. अशी भावना दीपक करकी यांनी व्यक्त केली आहे.
या यशस्वी कार्यास भक्ती जाधव, संतोष सूर्यवंशी, अमर मेटकरी, दीपक करकी यांनी परिश्रम घेतले.