Solapur Breaking
सोलापूर –
CM Ladki Bahin Yojana : मुख्यमंत्री शिंदे यांची तब्येत अचानक बिघडल्याने हा दौरा रद्द करण्यात आला आहे, त्यामुळे हा कार्यक्रम आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांच्या उपस्थिती होण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सोलापूर दौरा पुन्हा एकदा रद्द झाला आहे. शिंदे यांची तब्येत बरी नसल्याने मुख्यमंत्र्यांचे आजचे सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे निवडणुकीच्या तोंडावर अत्यंत महत्वाची ठरणारी आजची मंत्रिमंडळाची बैठकही रद्द करावी लागली आहे. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांचा सोलापूर दौरा पाचव्यांदा रद्द झाला आहे.