Baba Siddique Death News |
तीन वेळा आमदार राहिलेले आणि आघाडी सरकारमध्ये मंत्री म्हणून काम पाहिलेले अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते बाबा सिद्धिकी यांची गोळ्या घालून हत्या करण्यात आली आहे. सिद्धिकी यांचे पुत्र झिशान यांच्या कार्यालयासमोर ते उभे राहिलेले असताना अज्ञातांनी सिद्धिकी यांच्या दिशेने तीन गोळ्या फायर केल्या. सिद्धिकी यांच्या छातीत गोळी लागल्याने रुग्णालयात नेण्याआधीच त्यांचा मृत्यू झाला.