सोलापूर – ६८ व्या धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्त प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने भव्य दिव्य असा लेझिम ताफा काढण्यात आला. यावेळी प्रशिक सामाजिक संस्थेने लक्षवेधक असा सोलापुरात धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त ‘थंगलान’ या चित्रपटावर आधारित देखावा करण्यात आला होता.
मिलिंद नगर बुधवार पेठ येथील प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित छत्रपती शिवाजी महाराज चौकातून मोठ्या जल्लोषात व उत्साहात बहारदार असा लेझिमचा ताफा काढण्यात आला,
प्रथमतः थोरला राजवाडा मिलिंद नगर येथील विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थिविहार येथे लेझिम चा डाव खेळत संस्थे च्या वतीने सादर करण्यात आला,
डॉ.बाबासाहेब आंबेडकर प्रतिमेस पुष्प व पुष्पहार राजाभाऊ सरवदे तसेच मान्यवर यांच्या हस्ते अर्पण करून सामुदायिक बुद्ध वंदना घेण्यात आली,
धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मिरवणुकीच्या लेझिम ताफ्याचे उद्घाटन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष राजाभाऊ सरवदे यांच्या शुभहस्ते करण्यात आले,
यावेळी साहेबांनी देखील लेझिम चा डाव सादर करत सहभाग नोंदविला.
प्रशिक संस्थे च्या वतीने विषमता वादाने तोडलेला बुद्ध सम्राट अशोकाने समतेने जोडला यां अंतर्गत खोदाल जेथे बुद्ध तेथे हां अगळा वेगळा देखावा सादर करण्यात आला होता. हां देखावा मिरवणुकीचे मुख्य आकर्षण ठरला,
त्यांच प्रमाणे ढोल,ताशा,बँजो या पारंपरिक वाद्यांच्या गजरात लेझिम खेळाडू नी दिमाखदार असा लेझिम चा खेळ सादर करून सगळ्यांचे लक्ष वेधले.
लेझिम ताफ्यास पाहण्यासाठी महिला व बालकांची मोठी गर्दी जमली होती. सदर चा ताफा हां संस्थे चे संस्थापक अध्यक्ष सुशील सरवदे यांच्या नेतृत्वा खाली काढण्यात आला. ताफा यशस्वी करण्यासाठी संस्थेचे सल्लागार शिवम सोनकांबळे,सागर बाबरे,अध्यक्ष श्रिशैल सोनू इंगळे, लेझिम प्रमुख अनिकेत जगताप व संस्थे च्यां सर्व सदस्य,पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.
संस्थे च्या वतीने काढण्यात आलेल्या ताफ्या मध्ये संस्थे च्या माध्यमातून केलेल्या समाज उपयोगी,सामाजिक व समाज सक्षमी करणासाठी केलेल्या कार्याची माहिती व फोटो हे एल ई डी स्क्रीन वर दाखवण्यात आले. प्रशिक सामाजिक संस्थेच्या वतीने काढण्यात आलेला ताफा हां परिपूर्ण व सोलापुरासाठी अविस्मरणीय होता.
सदर लेझिम ताफा यशस्वी करण्यासाठी ज्या लोकांनी प्रयत्न केले अशा सर्वांचे आभार संस्थेचे संस्थापक सुशील सरवदे यांनी मानले.