सोलापूर –
रेल्वे बोर्डाच्या स्वच्छता पखवाडा उपक्रमांतर्गत, सोलापूर विभागाने आज “नो सिंगल युज प्लास्टिक” या विशेष मोहिमेचे आयोजन केले. विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे आणि अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक अंशुमाली कुमार यांच्या उपस्थितीत रेल्वे कार्यालयात या मोहिमेचा शुभारंभ करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सिंगल युज प्लास्टिकच्या दुष्परिणाम या विषयी जनजागृती करण्याचे आवाहन करण्यात आले.विभागीय रेल्वे व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांनी सर्वांना मोहिमेत सक्रिय सहभाग घेण्याचे आवाहन करत प्लास्टिकमुळे होणारे पर्यावरणीय धोके लोकांपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प व्यक्त केला.
यावेळी कर्मचाऱ्यांनी स्टेशन, रेल्वे कॉलनी आणि वसाहतींमध्ये यात्रेकरू आणि कुटुंबीयांना सिंगल युज प्लास्टिक पासून दूर राहण्याचा संदेश दिला. जनजागृतीचा एक भाग म्हणून कापडी पिशव्या वाटण्यात आल्या, त्यावर पर्यावरण विषयक संदेश छापले होते.
कार्यक्रमाच्या समारोपप्रसंगी वरिष्ठ विभागीय संरक्षा अधिकारी, सोलापूर यांनी या उपक्रमात सहभाग घेतलेल्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले. रेल्वे विभागाच्या या उपक्रमामुळे प्लास्टिक मुक्ती संदेश प्रभावीपणे पसरवण्यात येईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.