सोन्या-चांदीसह विविध वस्तूंच्या खरेदीसाठी शुभमुहूर्त
सोलापूर – सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. भविष्यात अशीच वाढ कायम राहिली तर दिवाळीपूर्वीच सोनं थेट 80 हजारांच्या पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. परंतु उद्या पुष्य नक्षत्राचा योग जुळून आल्याने सोने खरेदी करणे शुभ मानले जाते.
दिवाळीच्या आधी म्हणजेच ऑक्टोबर रोजी पुष्य नक्षत्राचा योग जुळून आला आहे. हा योग सर्व प्रकारच्या खरेदीसाठी सर्वोत्तम क्षण मानला जातो आहे. कार्तिकातील कृष्णपक्ष अष्टमी तिथी गुरुवारी येणार असल्याने याला गुरुपुष्य नक्षत्र असे म्हटले जाते.
आहे. त्यामुळे लहानापासून ते मोठ्या खरेदीसाठी सर्वोत्तम शुभ आणि फलदायी अशी वेळ मानलेली आहे.
पुष्य नक्षत्र हा कर्क मंगळ आणि चंद्र सोबत येत आहे. सोबतच लक्ष्मण सर्व सर्वार्थसिद्धीसह अमृतसिद्धी योग
दिवाळीच्या आधी आल्यामुळे याचे महत्त्व खूप वाढलेले आहे. शुभकार्यासाठी उद्या म्हणजेच दि. २४ ऑक्टोंबर १२:०० वाजेपासून ते दुपारी १:३० सायंकाळी आणि सायंकाळी ४:३० वाजेपासून ते रात्रीच्या ९:०० वाजेपर्यंत सर्वात चांगला योग आहे. दि.२४ ऑक्टोबर रोजी दिवसभर सर्वार्थसिद्धी सोबतच अमृतसिद्धी योग शुभल प्रदान करेल.
पुष्य नक्षत्रावर सोन्याच्या खरेदी सह अन्य व्यवहार ठरतील शुभ
पुष्य नक्षत्राच्या मुहूर्तावर सोन्याची खरेदी करावी.गुरुवारी हे नक्षत्र आल्याने ह्याला गुरु पुष्य नक्षत्र असे मानले जाते. वर्षातून जवळपास ३ ते ४ वेळा हया नक्षत्राचा योग लाभत असतो. हे नक्षत्र शुभ असल्याने केलेली खरेदी ही शुभदायक आणि फलदायक ठरत असते. हा सुवर्ण योग दिवाळी आधी लाभल्याने नागरिकांनी सोने,व्यवसायासाठी जागा, घर असे व्यवहार करणे शुभ असते. यामुळे सोन्याचा कधीही क्षय होत नाही. प्लॉट किंवा जमिनीची खरेदी केल्याने त्या शेवटपर्यंत कायम राहतात.दिवाळी आधी हा योग आला असून सर्वांनी सोने खरेदी करा व दिवाळी आनंदात साजरी करा.
– मोहन दाते, पंचांगकर्ते
गेल्या सहामाहिन्यांपासून सोन्याचे भाव –
मे – ७१ हजार १४०
जून – ७१ हजार ६६०
जुलै – ७१ हजार ३४०
ऑगस्ट – ६९ हजार ६००
सप्टेंबर – ७१ हजार २३०
ऑक्टोंबर – ७८ हजार ८००
इतका झाला असून दिवाळी पर्यंत हा भाव ८० हजार इतका जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
नागरिकांचे सोन्यासह चांदी आणि डायमंड खरेदी कडे कल वाढत चालला आहे. उद्या गुरुपुष्य नक्षत्र आले असून सोने, प्लाट, घर खरेदीसाठी शुभ योग मानला जातो. दिवसेंदिवस सोन्याचे दर वाढत चालले आहेत त्यामुळे नागरिकांनी आताच सोने खरेदी करुन ठेवावे कारण ते पुढे जाऊन फायदेशीर ठरेल.
⁃ मिलिंद वेणेगुरकर, सोने व्यापारी