सोलापूर : एम आय एम पक्षाचे उमेदवार फारूक शाब्दि यांनी सोलापूर शहर मध्य या मतदारसंघात आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यापूर्वी काढलेल्या भव्य अशा रॅलीने सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. युवकांचा प्रचंड उत्साह या रॅली मध्ये पाहायला मिळाला. या रॅलीत एमआयएमच्या समर्थक कार्यकर्त्यांनी हातामध्ये हिरवे, भगवे, निळे झेंडे घेऊन सहभाग नोंदवला.
पक्षाचे प्रदेशाध्यक्ष माजी खासदार इम्तियाज जलील यांच्या उपस्थितीत निघालेल्या या रॅलीतून उमेदवार फारूक शाब्दि यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. जिंदा शहा मदार चौक या ठिकाणाहून ही रॅली विजापूर वेस, बारा इमाम चौक मार्गे पुढे सिव्हील चौक या ठिकाणी आली. तिथून आपला उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी शाब्दि हे इम्तियाज जलील यांच्यासोबत निवडणूक निर्णय कार्यालयाकडे रवाना झाले.