सोलापूर – विधानसभा निवडणुकीचे वातावरण आता चांगलेच तापले आहे. शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठी भाजप पक्षाकडून देवेंद्र कोठे यांना उमेदवारी जाहीर झाली त्यानंतर भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. आज सकाळी भाजप कार्यालयात देवेंद्र कोठे यांनी प्रवेश करताच कार्यालयाच्या पायरीला स्पर्श करून आशीर्वाद घेतला. त्यानंतर सर्वांचे आशीर्वाद घेतले. यावेळी देवेंद्र कोठे यांनी सर्वांचे आशीर्वाद घेऊन भाषणास सुरुवात केली. ते म्हणाले आपण सर्वांचा आशीर्वाद माझ्या पाठीमागे असू द्या,राज्याचे उप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला संधी देऊन उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे तुम्ही सर्वांनी देखील माझ्या पाठीमागे खंबीर उभे राहावे. आणि ही मध्याची जागा आपण नक्कीच जिंकू असा आशावाद व्यक्त केला.
शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने अमित शहा यांच्याविरोधात निदर्शने आंदोलन सोलापूर-: शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आज महाराष्ट्रातील सर्व जिल्हा...
Read more