सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची अपडेट समोर आली असून मोहोळ अनुसूचित जाती या विधानसभा मतदारसंघाचा उमेदवार बदलण्यात आला आहे. सिद्धी रमेश कदम यांच्या ऐवजी आता ही उमेदवारी राजू खरे यांना देण्यात आली आहे.
सिद्धी कदम या माजी आमदार रमेश कदम यांच्या कन्या आहेत. परंतु या उमेदवारीला मोहोळ मधील सर्व पक्षाच्या नेत्यांनी विरोध केला. यामध्ये उमेश पाटील यांचा पुढाकार पाहायला मिळाला. त्याला जिल्हाध्यक्ष काका साठे यांनीही त्याला मंजुरी दिली. त्यामुळे राजू खरे यांना आता उमेदवारी देण्यात आली आहे.