सोलापूर –
सोलापूर शहरातील जागावाटपामुळे कार्यकर्ते महायुतीतून बाहेर पडले . सोलापूर शहर मध्यच्या जागेवरून शिवसैनिकांमध्ये प्रचंड रोष होता. वास्तविक शहर मध्यची जागा ही शिवसेनेला सुटणार हे जवळपास निश्चित झाले होते. शिवसेनेतील अंतर्गत वादामुळे ती जागा भाजपच्या वाट्याला आली. शिवसेनेचे चारही जिल्हाप्रमुखांनी राजीनामा देत स्वराज्य पक्षात प्रवेश केला.
सोलापुरात घडलेल्या राजकीय खळबळी वरुन शिवसेनेचे सोलापूर समन्वयक दिलीप कोल्हे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
यावेळी बोलताना कोल्हे म्हणाले, महायुतीचा धर्म आपण पाळला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्रात एवढी कामे केली. ज्या पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडून स्वराज्य पक्षात प्रवेश करुन उमेदवारी अर्ज भरणे हे पक्षाच्या हिताचे नाही. भांडण कुठ पर्यंत असावी उमेदवारी जाहीर होई पर्यंत असतो. त्यांच्या चुकीवर वरिष्ठ निर्णय घेतील. आणि आम्ही मुख्यमंत्री शिंदेंसोबत आहोत. मुख्यमंत्र्यांनी दखल न घेतल्याचे आत्मपरीक्षण त्यांनी स्वतः कराव.अपक्ष उभारतील अशी अपेक्षा होती परंतु आपला पक्ष सोडून दुसऱ्या पक्षातून उमेदवारी अर्ज भरणे गैर आहे. महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांनी केलेलं काम सर्व सामान्यांच्या मनात घर करतंय. यामुळे आम्ही शिवसेना व महायुतीचे काम करणार अशी भूमिका शिवसेनेच्या दिलीप कोल्हे यांनी स्पष्ट केली आहे.
यावेळी दिलीप कोल्हे, लक्ष्मीकांत ठोंगे – पाटील, नाना मस्के, संजू सरवदे, नवनाथ चव्हाण, मनीषा नलावडे , जयश्री पवार, सुनंदा साळुंके , पूजा चव्हाण, संगीता खांबस्कर, मंगल कोल्हे
चौकट –
आम्ही महायुती धर्माचे पालन करणार, उत्तर मधून विजय देशमुखांचे तर मध्य मधून देवेंद्र कोठेंचे काम करणार आणि शिवसैनिक म्हणून आम्ही मुख्यमंत्र्यांच्या पाठीशी
– दिलीप कोल्हे, शिवसेना समन्वयक सोलापूर