सोलापूर –
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे उमेदवार महेश कोठे यांनी आपल्या प्रचार रॅलीत जोरदार आघाडी घेतली आहे, महेश कोठे यांचे प्रत्येक ठिकाणी जोरदार स्वागत करण्यात येत आहे, ठिकठिकाणी महिला औक्षण करत असून कार्यकर्त्यांकडून पुष्पवृष्टी करून स्वागत करण्यात येत आहे, दरम्यान शहर उत्तर मध्ये यंदा तुतारीच वाजणार आणि महेश कोठे यांना निवडून आणण्याचा निर्धार शहर उत्तर मधील जनतेने केला आहे,
बुधवारी सकाळी प्रभाग अकरा मध्ये महेश कोठे यांच्या प्रचार पदयात्रेचे आयोजन करण्यात आले होते, आय ग्रुप गणपती मंदिर येथून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली, नंतर पदयात्रा सोनिया नगर, जे ग्रुप, जे 1 ग्रुप, कोटा नगर रेणुका नगर, गोकुळ नगर, समता नगर, क्षिरालिंग नगर, पिठ्ठा नगर, ब्राम्हणाय नगर, चाकोते नगर, सरवदे नगर, भारत नगर, योगेश्वर नगर, बागवान नगर, मंत्री चंडक नगर, मार्गे सुजाता नगर येथे समारोप करण्यात आला, यावेळी ठिकठिकाणी महेश कोठे यांचे जोरदार स्वागत करण्यात आले, तसेच युवक आणि युवतींनी पथनाट्य सादर करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले,
यावेळी महिलांनी महेश कोठे यांचे औक्षण करून स्वागत केले मतदार यंदा आपल्यासोबत सोबत यंदा शहर उत्तर मध्ये तुतारी वाजणार आणि जनता मला भरघोस मतांनी निवडून देणार असा विश्वास महेश कोठे यांनी व्यक्त केला