सोलापूर : समता सैनिक दलाचे सर्वेसर्वा तथा निवृत्त पोलिस उपनिरीक्षक केरु जाधव यांचे हृदयविकाराने आज दि. 4 नोव्हेंबर 2024 रोजी रात्री 1 वाजण्याच्या सुमारास हृदय विकाराच्या झटक्याने निधन झाले.
न्यू बुधवार पेठ, समता परिवार चौक येथील कुंज भरारी निवासस्थानापासून त्यांची अंत्ययात्रा निघणार आहे.
आज दुपारी 3 वाजता कारंबा नाका स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. 1984 ला पोलिस खात्यात पोलिस शिपाईपदी रुजू झाले होते. सन 2020 मध्ये पोलीस उपनिरिक्षक म्हणून निवृत्त झाले होते. गेली 30 वर्षापासून समता सैनिक दलात कमांडिंग ऑफिसर म्हणून सक्रिय होते. चांगल्या पद्धतीने दलाचे संघटन त्यांनी केले. त्यांच्या पश्चात पत्नी, भाऊ, बहीण, दोन मुले, एक मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे.