सोलापूर प्रतिनिधी –
सोलापूर जिल्ह्यातील CNG दर व आजूबाजूच्या जिल्ह्यातील CNG दर यामध्ये कमीत कमी किलोच्या मागे आठ ते दहा रुपयाचा फरक आहे. या अशा वाढीव दरामुळे सोलापूर जिल्ह्यातील रिक्षा चालक व प्रवासी वाहने यांच्यावर आर्थिक बोजा पडत आहे. सोलापूर जिल्ह्यातच हा दर का वाढीव असावा अशा अनेक तक्रारी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यालयात येत होत्या त्या तक्रारीचा पाढाच मनसेने जिल्हाधिकाऱ्यांसमोर वाचला व त्या विषयाचे निवेदन जिल्हाधिकारी श्री कुमार आशीर्वाद यांना आज रोजी दिले.
यावेळी उपस्थित जिल्हाध्यक्ष विनायक महिंद्रकर, लोकसभा अध्यक्ष प्रशांत इंगळे ,शहराध्यक्ष जैनुद्दीन शेख, मनविसे राज्य उपाध्यक्ष अमर कुलकर्णी, जिल्हा उपाध्यक्ष सत्तार सय्यद, मनविसे जिल्हाध्यक्ष अभिषेक रंपुरे ,शिक्षक सेना राज्य उपाध्यक्ष संतोष घोडके सर, चिटणीस विश्वास गजभार, वाहतूक सेना जिल्हा संघटक प्रसाद कुमठेकर ,शहर संघटक जितेंद्र टेंभुर्णीकर ,मनविसे शहराध्यक्ष बाळासाहेब सरवदे ,स्वयंरोजगार चे जिल्हा संघटक गोविंद बंदपट्टे , लकी चव्हाण व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते.