सोलापूर प्रतिनिधी – सोलापूरात गेल्या तीन वर्षापासून नळ कनेक्शन नसलेल्या नागरिकांना खाजगी पाणीपट्टी सरसकट आकारली जात आहे हे माहिती असूनही आ. विजय देशमुख (Vijaykumar Deshmukh)गप्प का होते ? निवडणूका जवळ आल्या म्हणून सूचलेलं शहाणपण आहे अशी टिप्पणी माजी महापौर यू.एन. बेरिया (U. N. Beriya) यांनी केली आहे.
ते म्हणाले गेली १५ वर्ष पाणी पुरवठा आहे. गेली ५ वर्ष त्यांची असतानाही काही केलं नाही. आम्ही पाणी पुरवठयासंदर्भात सत्तेत असताना आणि नसतानाही जनतेच्या बाजूनं उठाव केला आहे. बेरिया म्हणाले, सोलापूरात पालिका आयुक्तांनी शासनाच्या आदेशाचा सोयीनं आणि चुकीचा अर्थ लावून ज्यांच्याकडे नळ नाहीत त्यांच्याकडून पाणीपट्टी वसुली सुरू केली आहे. हि पूर्णतः बेकायदेशीर आहे. आपण या संबंधात मुंबई उच्च न्यायालयात विस्कळीत जनहित याचिकाही दाखल केली असल्याचं बेरिया यांनी सांगितलं.