सोलापूर प्रतिनिधी |
Pandharpur Wari 2024 | नातवानं आजीला घडवली वारी, खांद्यावर घेऊन चढला दिवे घाट
आषाढी वारी आणि वारकरी हा पंढरपुरात भरणारा सर्वात मोठा सोहळा आहे. या वारी दरम्यान काही पारंपरिक सोहळे घेतले जातात. ज्यातील प्रमुख सोहळा म्हणजे रिंगण सोहळा जो या संपूर्ण वारीचे वैशिष्ट्य असते.
ज्ञानोबा माऊली तुकाराम, पाऊले चालती पंढरीची वाट… अशा जयघोषात वारकरी ऊन-पावसाची तमा न बाळगता आपल्या विठुरायाच्या भेटीसाठी पालखी सोहळ्यात चालत आहेत. पंढरपूरकडे मार्गस्थ झालेल्या पालखीने दिवे घाट पार केला असून अतिशय नागमोडी घाट त्यांनी विठू नामाच्या गजरात सर केला आहे.
फलटणच्या वय वर्षे ९० च्या सुंदराबाई धुमाळ गेली दहा वर्षांपासून माऊलींची वारीत सहभागी होतात. याही वर्षी त्या वारीत आहेत. माऊलींच्या मार्गातील सर्वात कठीण असणारा दिवेघाट नातवाच्या खांद्यावर बसूनच त्यांनी पार केला.