सोलापूर प्रतिनिधी –
सोलापूर रेल्वे विभागातील कर्मचाऱ्यांनी प्रामाणिकपणाचे दर्शन घडवीत आपले कर्तव्य पार पाडलेआपल्या कर्तव्यावर कार्यरत असताना स्वतःमध्ये असणारा प्रामाणिकपणा दाखवत प्रवाश्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेतली आहे. त्यापैकी खालील घटनेतून रेल्वे कर्मचाऱ्यांनी समयसूचकता दाखवत प्रवाश्यांचा ऐवज मिळवून दिला आहे.
सोलापुरातील टिकट चेकिंग स्टाफ श्री बन्नु सिंह मीना यांनी रेल्वे मध्ये विसरलेली प्रवाश्याची पर्स परत करीत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे . यातील घटना अशी कि , गाडी क्र 22160 चेन्नई-सीएसएमटी या एक्सप्रेसमध्ये तिकीट चेकिंग दरम्यान त्यांना A2 कोच मध्ये एक पॉकेट मिळाले. त्यामध्ये 10,000/- रुपये रोख रक्कम, ड्रायविंग लायसेन्स, पॅन कार्ड, आधार कार्ड एटीएम अशी महत्वाची मूळ कागदपत्रे होती. तेव्हा संबंधित प्रवाश्याच्या PNR आणि सीट नंबर वरून त्या प्रवाश्याचे नाव आणि पॉकेट मध्ये असणाऱ्या मूळ कागदपत्रांवरून माहिती घेत, सदरची रोख रक्कम आणि कागदपत्रे असणारी बॅग संबंधित प्रवाशाने परत केली. त्यावेळी संबंधित व्यक्तीने श्री बन्नु सिंह मीना आणि रेल्वेचे आभार मानले. श्री बन्नु सिंह मीना यांनी आपली नोकरी करताना सोबत कर्तव्य पार पडत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे .
सोलापुरातील टिकट चेकिंग स्टाफ श्री फैझल शेख यांनी आपले कर्तव्य बजावताना प्रवाश्यांच्या सुरक्षिततेची काळजी घेत चोराला पकडून दिले आहे. यात घडलेली घटना अशी कि, गाडी क्र. 01413 निजामाबाद-पंढरपूर पॅसेंजर मध्ये लातूर स्थानकावर तिकीट चेकिंग करतेवेळी एका चोराला मोबाइल चोरी करताना पाहिले, तात्काळ त्यांनी त्याला ताब्यात घेऊन आरपीएफ च्या स्वाधीन केले. चौकशीत सदरच्या चोराकडून 2 चोरीचे मोबाइल हस्तांतरित करण्यात पोलिसांना यश मिळाले. श्री फैझल शेख यांनी दाखविलेल्या समयसूचकता मुळे प्रवाशांच्या सुरक्षेची हमी मिळाली.
सोलापुरातील टिकट चेकिंग स्टाफ श्रीमती शहनाझ शेख यांनी विसरलेली बॅग प्रवाश्याच्या हाती सुपूर्द करत प्रामाणिकपणाचे दर्शन घडवले आहे. यात घडलेली घटना अशी कि गाडी क्र. 11301 सीएसएमटी-बेंगळुरू जाणारी उद्यान एक्सप्रेस मध्ये कलबुर्गी स्थानकावर सदर प्रवासी आपली बॅग गाडीत विसरून गेला. त्यावेळी आपल्या कर्तव्यावर स्थित असणाऱ्या टिकट चेकिंग स्टाफ श्रीमती शहनाझ शेख यांच्या निदर्शनास ती बॅग आली. श्रीमती शहनाझ शेख यांनी आसपासच्या प्रवाश्याकडून चौकशी करीत तसेच PNR नंबर च्या साहाय्याने सादर प्रवाशांची माहिती काढून त्यांना संपर्क साधला आणि कलबुर्गी स्थानकावर त्या प्रवाश्याला बोलावून घेत बॅगेची ओळख पटवून ती बॅग सुखरूप त्याच्या स्वाधीन केली.
मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाचे वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक श्री.योगेश पाटील यांच्याकडून या सर्व कर्तव्यनिष्ठ कर्मचाऱ्यांचे कौतुक करण्यात आले.