man marathi news,
सोलापूर प्रतिनिधी – सोलापुरातील ज्येष्ठ पत्रकार अविनाश व्यंकटेश कुलकर्णी वय 64 यांचे अल्पशा आजाराने आज दि.13 रोजी सायंकाळी 7:30 वाजता निधन झालं.
त्यांचा पार्थिव उद्या दि. 14 रोजी सकाळी 7 वाजता पत्रकार नगर येथील निवासस्थानी अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. सकाळी 8 वाजता त्यांची अंत्ययात्रा निघेल. मोदी विद्युत दाहिनी मध्ये त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येतील.
अविनाश कुलकर्णी यांनी दैनिक केसरी, दैनिक संचार. दैनिक पुढारी,सोलापूर वृत्तदर्शन यामध्ये अनेक वर्ष पत्रकारितेचे काम केलं आहे. त्यांच्या पश्चात पत्नी निता कुलकर्णी, मुलगी सुप्रिया कुलकर्णी याचबरोबर मोठे बंधू वहिनी असा परिवार आहे.