man marathi news,
सोलापूर प्रतिनिधी – सोलापूरचे फोटोग्राफर शिवाजी धुते यांनी पंढरपूरमध्ये चित्रित केलेल्या ‘रिल’ मुळे मुंबईच्या तरुणाला माउली सापडली. शिवाजी धुते हे छायाचित्रकार सोलापूर ते पंढरपूर असा आषाढी वारीचा सोहळा कॅमेऱ्यात टिपण्यासाठी गेले होते. १४ जुलैरोजी पंढरपुरात असताना एका चिमुकल्याने त्यांचे लक्ष वेधून घेतले. तो चिमुकला पावसापासून संरक्षण करणारे रेनकोट विकत होता. त्याची धडपड धुते यांनी कॅमेऱ्यात टिपली. ती रिल सोशल मीडियावर ‘व्हायरल’ झाली त्या व्हिडिओ मध्ये मुंबई मधून बेपत्ता असलेल्या ऐका महिलेचा शोध लागला, तुम्ही पांडुरंगा सारखे धावून आलात आणि माझी आई मला शोधून दिली, अस त्या बेपत्ता असलेल्या महिलेच्या मुलांनी प्रतिपादन केलं आहे. एका आईला त्यांच्या परिवाराशी गाठ घालून देणारा वारीतला पांडुरंग