man marathi news,
सोलापूर / solapur
सोलापूर प्रतिनिधी –
“अगदीच इतरांसारखे नसावे अन् इंतराहून फार वेगळे
न दिसावे” या नियमांचे पालन ज्याच्याकडून होते
त्यालाच समाज आपला नेता मानत
असतो.. सर्वसामान्यांना वेळ देणारा, त्यांच्यात
मिसळणारा, त्यांच्या सुख दुःखात जावून नेणाऱ्या
माणसाला लोक डोक्यावर घेतात..
सर्वात महत्वाची बाब म्हणजे स्वच्छ प्रतिमा आणि चारित्र्यसंपन्नता लाभलेले एक असामान्य भविष्यातील दमदार नेतृत्व म्हणून नेताकडे पाहिले जात आहे. व्यक्तीमत्वासाठी लागणाऱ्या पट्टीतील या अनेक निकषांशिवाय संयमी, स्पष्टवक्तेपणा, मनमिळावू स्वभाव, जनसेवेसाठी सदैव तत्पर आणि महत्वाची बाब म्हणजे खऱ्याला खरे आणि खोट्याला खोटे म्हणणारे स्पष्टवक्ते नेते म्हणजे नेता होय.
सोलापुरातील युवा नेते किरण नेता सावंत तथागत सामाजिक संस्थेचे संसथापक यांच्या 25 व्या वाढदिवसानिमित्त श्री सिद्धेश्वर मंदिर परिसरातील असलेल्या गोरगरीब १०० व्यक्तींना अन्नदान वाटपाचा उपक्रम किरण सावंत यांच्या वाढदिवसाच्या निमित्त करण्यात आला.
गोरगरीबांना अन्नदान वाटप करण्याचे संस्थेचे दुसरे वर्ष असून गरिबांना अन्न वेळेवर मिळावे आणि त्यांच्या गरजा भागवणे हाच आमचा हेतू असल्याचे किरण सावंत यांनी सांगितले.
यावेळी उपस्थित पंचशिल तरुण मंडळाचे अध्यक्ष सुरज मुन्ना चंदनशिवे, बॅाबी सावंत, विनायक सावंत, कुनाल सोनवने, ओंकार गायकवाड. आदेश नागटीळक, शवन उबाळे, संदेश साळुंखे, गौरव सोनवने, रोहीत कांबळे, सोमा मस्के आदी उपस्थित होते.