Solapur / सोलापूर
सोरेगाव, भाटेवाडी, केगाव शिवारात बिबट्याचा वावर
ट्रॅप कॅमेरे लावले, गरज पडल्यास पिंजराही ठेवणार
शहरालगतच्या भाटेवाडी, नंदूर, डोणगाव परिसरात बिबट्याच्या पायाचे ठसे आढळले आहेत. वन-विभागाने त्या परिसरात ट्रॅप कॅमेरे बसविले असून आवश्यकतेनुसार पिंजरा लावण्याची तयारी केली आहे. पायाच्या ठशांवरून तो बिबट्या तरुण असल्याचे वाटते. तो बाहेरून आला असण्याची शक्यता आहे. नागरिकांनी गर्दी, गोंधळ न करता सतर्कता बाळगावी, असे आवाहन वनविभागातर्फे करण्यात आले.
गेल्यावर्षी कोंडी (ता. उत्तर सोलापूर) शिवारात बिबट्या आढळला होता. त्यानंतर पुन्हा आता शहरालगतच्या परिसरात वावर आहे.. चार-पाच दिवसांपूर्वी केगाव येथील एका शिक्षण संस्थेच्या भिंतीवर बिबट्या बसल्याचे दिसले होते. त्या ठिकाणी पायाचे ठसे वन कर्मचाऱ्यांना आढळले होते. त्यानंतर गेल्या दोन दिवसांपासून सोरेगाव, भाटेवाडी शिवारातील तलाव, उसाच्या शेताजवळ बिबट्या दिसल्याचा व्हिडिओ समाजमाध्यमात व्हायरल झाला
बिबट्या दिसल्याचा हा व्हिडिओ समाज माध्यमांत व्हायरल झाला. मात्र, तो सोलापूरचा असेल्याची पुष्टी झाली नाही.