सोलापूर प्रतिनिधी –
दि. २७/०७/२०२४ रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आलेले आहे.
प्रलंबित खटले तडजोडीने निकाली काढण्याच्या दृष्टीने मे. न्यायालयाकडून वाहन चालक/ मालक यांना जवळपास १०,००० समन्स काढण्यात आलेले आहेत.
सदरचे समन्स हे पोलीस ठाणे व ट्राफिक ब्रँचकडून संबंधितांना बजावणी करुन शहरातील व बाहेरील व्यक्तींना लोक अदालतीपुर्वी दंडाची रक्कम भरणा करुन घेवून पुढील होणारी कायदेशीर कारवाई टाळून घेणेबाबत आवाहन पोलीसांकडून करण्यात येत आहे.
दंडाची रक्कम :-
- वाहतुक शाखेचे अंमलदारकडे ई-चलान मशीनद्वारे भरता येईल.
- ऑनलाईन पद्धतीने https://mahatrafficechallan.gov.in/ या लिकद्वारे दंडाची रक्कम भरता येईल.
- त्याचप्रमाणे mahatraffic हे एप डाऊनलोड करुन Phone pe, Google pay द्वारे तसेच QR code scan करुन भरु शकता.
- महत्त्वाचे –
(दंड न भरल्यास पुढील कार्यवाही केली जाईल प्रसंगी वॉरंट काढणेबाबत मा. न्यायालयास विनंती केली जाईल.)