सोलापूर प्रतिनिधी –
दि. २७ जुलै २०२४ रोजी, श्री छत्रपती रंगभवन नाट्यगृह येथे दुपारी ४ वाजता, कलाश्री नृत्यालयाच्या रौप्य मोहोत्त्सवी वर्ष निमित” कृष्णानुभूती” हा भरतनाट्यम नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून गुरुवर्य रघुनाथ गड्डम यांची उपस्थिती आहे व प्रमुख पाहुणे म्हणून पी आर कुलकर्णी, पांडुरंग व्हनकडे व अश्विनी जाधव उपस्थित राहतील.
गेल्या २५ वर्षा पासून कलाश्री नृत्यालयाच्या माध्यमातून नृत्य विशारद सौ. शिल्पा दीक्षित या अनेक विद्यार्थीनींना भरतनाट्यम नृत्याचे शिक्षण देत आहेत. आता पर्यंत विद्यालयाच्या अनेक विद्यार्थीनींनी नृत्य विशारद पदवी संपादन केली आहे. या वर्षी नृत्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्ष निमित्त कलाश्री नृत्यालयाच्या ६० विद्यार्थिनी कृष्ण जीवनावर” कृष्णानुभूती ” हा कार्यक्रम सादर करणार आहेत.