प्रतिनिधी –
घरच्यांशी झालेल्या विसंवादातून वाद विकोपाला गेला. दररोज आई-बाबांचे भांडण आणि ती’ ची होणारी घुसमट तिला आता असह्य होत होती. आपण घरून निघून जाऊ, जेणेकरून आपल्या मनाला आणि शरीराला शांती मिळेल या हेतूने तिने घरातून पलायन केले.
सोलापूर रेल्वे स्थानकावर बागलकोट-यशवंतपूर एक्सप्रेस उभी होती . ती’ ने कसलाही विचार न करता आपणाला फक्त आपल्या घरच्यांच्या त्रासापासून मुक्त व्हायचे हा सततचा विचार ती’ च्या डोक्यात होता त्याच विचाराने ती ट्रेन मध्ये चढली, गाडी यशवंतपूरच्या दिशेने निघाली. ती विनातिकीट चढली खरी, पण कर्तव्यावर स्थित असणारे तिकीट निरीक्षक श्री. प्रशांत गाडे यांनी तिला तिकिटासंबंधी विचारले, चौकशीत तिने तिची सर्व कौटुंबिक पार्श्वभूमी आणि घडलेला घटनाक्रम तिने श्री.गाडे याना सांगितला. श्री. गाडे यांनी तात्काळ संबंधित घटना नियंत्रण कक्षाला कळवली. नियंत्रण कक्षाने आरपीएफ शी संपर्क साधला आणि कलबुर्गी रेल्वे स्थानकावर त्या मुलीला उतरवले. आरपीएफ आणि चाइल्ड केअर यांच्या मदतीने ती’ ला तिच्या पालकांच्या स्वाधीन करण्यात येत आहे.
कौटुंबिक क्लेश आणि घरात आपली वागणुकीचा एका नाबालिकांवर किती चुकीचा प्रभाव पडू शकतो हेच यातून शिकण्यासारखे आहे. आरपीएफ कर्मचारी आणि तिकीट निरीक्षक श्री. प्रशांत गाडे यांच्या तत्परतेमुळे ती’ चे चुकीचे पलायन रोखले गेले. त्याबद्दल श्री. गाडे यांचे कौतुक होत आहे.