Riteish Deshmukh slams Jahnavi Killekar :
Bigg Boss Marathi 5 Updates: ‘बिग बॉस मराठी’चे पाचवे पर्व सुरू आहे. हा शो सुरू होऊन दोन आठवडे झाले आहेत. शोचा पहिला आठवडा घरात सर्वांशी वाद घालून निक्की तांबोळीने गाजवला, तर दुसऱ्या आठवड्यात जान्हवी किल्लेकरची घरातील सदस्यांशी भांडणं झाल्याचं पाहायला मिळालं.
जान्हवीने वर्षा उसगांवकर, अभिजीत सावंत, आर्या जाधवशी यांच्याशी कडाक्याची भांडणं केली. एका भांडणात जान्हवी अभिजीतला बांगड्या घाल असं म्हणाली होती. तिच्या त्याच वक्तव्यावरून ‘भाऊचा धक्का’ मध्ये होस्ट रितेश देशमुखने तिला खडे बोल सुनावले. इतकंच नाही तर संतापलेल्या रितेशने जान्हवीला घरातून बाहेर काढण्याचंही वक्तव्य केलं. ‘बिग बॉस मराठी’चा हा नवीन प्रोमो चांगलाच चर्चेत आहे.