सोलापूर –
78 व्या स्वतंत्र्य दिनानिमित्त हराळवाडी येथे 78 रोपांचे वृक्षारोपण
गावाला वनराई करणाऱ्या एसपी ग्रुपसह वृक्षारोपणास एकवटले गाव
मोहोळ तालुक्यातील हराळवाडी येथे एसपी ग्रुपच्या वतीने सालाबादप्रमाणे याही वर्षी वर्षी वृक्षारोपण करण्यात आले. सामाजिक कार्यकर्ते पैलवान माऊली हेगडे यांनी जिल्हा परिषद शाळेत लावलेल्या झाडांचा 7 वा वाढदिवस नुकताच पार पडला. 78 व्या स्वतंत्र दिनानिमित्त 78 रोपांचे वृक्षारोपण भारतीय सैन्य दलात कर्तव्य बाजवणारे मेजर गणेश बामणे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी अफसर मुजावर, बाळासाहेब पाटील, सचिन भोसले-पाटील, ग्रामसेवक राजकुमार सुतार आदींची प्रमुख उपस्थिती होती.
दुष्काळी पट्यातील गाव म्हणून मोहोळ तालुक्यातील हराळवाडी गावाची ओळख आहे. ही ओळख पुसून काढण्यासाठी एसपी ग्रुपच्या माध्यमातून मागील दहा वर्षांपासून गावात दरवर्षी वृक्षारोपण केले जाते. जिल्हापरिषद शाळा परिसर , व्यायामशाळा परिसर , रस्त्याच्या दुतर्फा, गायरान जमीन, ग्रामपंचायतीची मोकळी जागा आदी ठिकाणी पिंपळ,कडुलिंब,जांभूळ आणि आंबा झाडांची रोपे लावण्यात आली आहेत.
विविध कारणाने पृथ्वीचे तापमान वाढत असून प्रत्येक नागरिकांना भविष्यात वाढत्या तापमानाचा सामना करावा लागणार आहे. याचा विचार करुन एसपी ग्रुपचे सामाजिक कार्यकर्ते पै. माउली हेगडे यांच्या प्रयत्नातून गावात वृक्षारोपण घेण्यात येते.स्वतंत्रदिनी 78 रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जेष्ठ नागरिक साधूनाना पाटील, चंद्रकांत ढगे, प्रभाकर शेळके, पै.रवि शेळके, दत्तात्रय शेळके, अर्जुन ऐवळे, पै.वाल्मीक माने, उत्तम केंगार,सत्यवान हराळे,रंगनाथ गावडे हे मान्यवर उपस्थित होते. सदर कार्यक्रम पार पाडण्यासाठी सचिन मोटे, जयराम शिंदे, मुन्ना कांबळे, हणमंत ऐवळे, भरत गायकवाड, गौरव गायकवाड,हणमंत तोरणे आदींनी परिश्रम घेतले.
“नुसते वृक्षारोपण करून आणि त्याचे फोटो काढून ग्लोबल वार्निंग थांबणार नाही. तर ही झाडे जगतील आणि या झाडांचे संगोपन होईल यावर येत्या काळात विशेष लक्ष दिले पाहिजे “, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते पै.माऊली हेगडे यांनी केले.