Abhijeet Bichukale Bigg Boss Marathi Wild Card Entry
BBM – बिग बॉस मराठीच्या घरात आता अभिजीत बिचुकले येणार असल्याची चर्चा रंगली आहे. कवी मनाचे नेते अशी ओळख असलेल्या अभिजीत बिचुकलेची आता बिग बॉस मराठीच्या घरात वाईल्ड एन्ट्री होणार असल्याचं बोललं जात आहे. कवी मनाचे नेते अशी ओळख असलेल्या अभिजीत बिचुकले बिग बॉस मराठीच्या दुसऱ्या पर्वात दिसले होते. त्यानंतर त्याला हिंदी बिग बॉस 15 मध्ये वाईल्ड कार्ड एन्ट्री देण्यात आली होती. आता बिग बॉस मराठीच्या पाचव्या पर्वात अभिजीत बिचुकले झळकणार असल्याचा दावा केला जात आहे.