प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडमध्ये सोलापूर विकास मंचच्या सदस्यांना मिळाले महत्त्वाचे धडे
सोलापूर विकास मंचच्या कोअर आणि वर्किंग कमिटी सदस्यांनी चिंचोळी एमआयडीसीमधील प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडच्या प्रकल्पांस भेट दिली. जागतिक पातळीवर कॅम्शाफ्ट निर्मिती मध्ये सोलापूरचे नाव आणि प्रतिमा सकारात्मक पोहोचवणाऱ्या कंपनीची ही भेट सर्वांसाठी अत्यंत शैक्षणिक आणि प्रेरणादायी ठरली. या औद्योगिक दौऱ्यादरम्यान सर्व सदस्यांनी वेळेचे व्यवस्थापन, स्वच्छता, मानव संसाधन आणि व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वाच्या बाबी शिकल्या.
दौर्याची सुरुवात प्रिसिजन कॅमशाफ्ट्स लिमिटेडचे संस्थापक अध्यक्ष यतीन शहा यांनी सोलापूर विकास मंचच्या सर्व सदस्यांचे स्वागत करून केली. त्यांनी कारखान्याची माहिती दिली आणि प्रकल्पाची सखोल माहिती दिली. या दौऱ्याच्या शेवटी यतीन शहा यांनी स्वतः उपस्थित सदस्यांनी विचारलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आणि कंपनीच्या भविष्यातील योजना आणि दृष्टीकोन सामायिक केला. या दौर्यादरम्यान कंपनीचे जनसंपर्क अधिकारी माधव देशपांडे यांनी कंपनीची सविस्तर माहिती दिली, तर सहायक जनसंपर्क अधिकारी संदीप पिस्के यांनी दौऱ्याचे समन्वयन केले.
प्रिसिजन सारखी शिस्त आणि वक्तशीरपणा प्रत्येक सोलापूरांनी अंगिकरावा असे गौरवोद्गार सोलापूर विकास मंचचे सदस्यांनी व्यक्त केला. ही औद्योगिक भेट सोलापूर विकास मंचच्या सदस्यांसाठी एक अनोखी शिकवणूक होती, जिथे त्यांनी उद्योगाच्या कार्यप्रणालीबद्दल थेट अनुभव घेतला. सदर अभ्यास दौऱ्यास सोलापूर विकास मंच कोअर आणि वर्किंग कमिटी सदस्यांचे विजय कुंदन जाधव, केतन शहा, योगिन गुर्जर, नितीन अणवेकर, अॅड. दत्तात्रय अंबुरे, डॉ. जगदीश पाटील, रमेश वायचळ, देविदास चेळेकर, प्रशांत भोसले, जयश्री तासगावकर, अर्जुन रामगिर, श्रीकांत बनसोडे, इक्बाल हुंडेकरी, संजय खंडेलवाल, श्रीकांत अंजुटगी, आरती अरगडे, माऊली झांबरे, अरविंद रंगा, रमेश माळवे, राजेश नाईक, सारंग तारे, गणेश शिलेदार, विजयराज बाहेती, अंकीत धरमसी आदी मान्यवर सदस्य उपस्थित होते.