सोलापूर – धनगर समाजाला एसटीतून आरक्षण देवून त्याची अमंलबजावणी करावी यासाठी आज जिल्ह्यात ठिकठिकाणी धनगर समाजाच्या वतीनं रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.
जिल्ह्यात आज मंगळवेढा मार्गावर देगांव येथे, हैद्राबाद रस्त्यावर बोरामणी येथे तर विजयपूर महामार्गावर तेरा मैल येथे तसेच पुणे-सोलापूर व तुळजापूर रस्त्यावरही हे रास्ता रोको आंदोलन झाले. यावेळी आंदोलक मोठ्या संख्येनं उपस्थित होते. काही आंदोलनाच्या ठिकाणी आंदोलकांनी मेंढ्याही आणल्या होत्या. आंदोलनामुळे काही काळ विविध मार्गावर वाहतूक सेवा विस्कळीत झाली होती.