राज्यात जातीयवादाने मोठ्या प्रमाणात वातावरण खराब केले जात आहे. अनेक नेते दुसऱ्या धर्माच्या विरोधात तणाव निर्माण होईल अशा पद्धतीची वक्तव्य करत आहेत. मात्र त्यांच्यावर कुठलीही कारवाई केली जात नाही. सरकार दुर्लक्ष करतच आहेच शिवाय त्याला खतपाणी घालत आहे. एकाच प्रकरणात 50 एफआयआर दाखल केल्यानंतरही कुठलीही कारवाई होत नाही. न्यायालय देखील त्याची दखल घेत नाही. त्यामुळे राज्यात वाढणारा हा जातीयवाद थांबवण्यासाठी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांना संविधानाची प्रत देण्यासाठी आम्ही मुंबईला जात असल्याचे एमआयएमचे नेते तथा माजी खासदार इम्तियाज जलील यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.एमआयएमच्या वतीने मुंबईपर्यंत निघालेल्या मोर्चाला सकाळी आठ वाजता सुरुवात झाली. छत्रपती संभाजीनगर शहरातील आणि मराठवाड्यातील शेकडो गाड्या या मुंबईला निघालेल्या मोर्चात सहभागी झाल्या आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गाड्यांची रांग पाहायला मिळाली.
सोलापूर- संस्कृत भारती पश्चिम महाराष्ट्र प्रांत, पुणे यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय संस्कृत सुभाषित पाठांतर स्पर्धा नुकतीच हरीभाई देवकरण प्रशालेत संपन्न...
Read more