सोलापूर प्रतिनिधी,
सोलापूर शहर व जिल्ह्यातील सर्व नागरिकांना अस आवाहन करण्यात येत आहे की, मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण स्थगित झाल्यामुळे व मनोज यांनी आज केलेल्या आवाहन नुसार उद्या जो आपण त्यांच्या समर्थनार्थ सोलापूर शहर व जिल्हा बंद पुकारला होता तो रद्द करण्यात येत आहे. तरी या बंदच्या निमित्ताने जिल्हयातील शेतकरी, कष्टकरी,सर्व समाजघटक , तसेच व्यावसायिक, शाळेतील व कॉलेजमधील विद्यार्थी व इतर सर्व व्यापारी संघटना यांची जी गैरसोय होणार होती. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करत आहोत. अशी माहिती सकल मराठा समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.