सोलापूर – सोलापूर शहरापासून दहा किलोमीटर अंतरावर डोणगाव हे गाव आहे.या गावातील शेतकरी आनंद शेटे यांनी आपल्या शेतात नवीन प्रयोग करायचं ठरवलं.आणि गेल्या 10 वर्षापासून त्यांनी कढीपत्त्याची लागवड 3 एकर शेतात केली असुन यातून वर्षाला त्यांची लाखोंची कमाई होत आहे.
आनंद शेटे हे गेल्या 10 वर्षापासुन कढीपत्त्याची शेती करत आहे. वर्षातून तीन वेळा या कढीपत्त्याची छाटणी करतात.कढीपत्त्याची लागवड करण्याआधी जमिनीची खत टाकून मशागत करावं लागते आणि तर ट्रॅक्टरच्या सहाय्याने नगरणी करुन घ्यावं लागेल.कढीपत्त्याची लागवड केल्यानंतर एका वर्षांनी त्याचा उत्पन्न सूरू होतो. आठ दिवसाला एकदा या कढीपत्त्यांचे पिकांवर फवारणी करावा लागते. बुरशीनाशक, कीटकनाशक या औषधांची फवारणी करावी लागते.3 एकर बागेत लावलेल्या कढीपत्त्याची छाटणी दर 4 महिन्याला शेतकरी आनंद शेटे हे करत आहे. दर छाटणीला या कढीपत्त्यांला वेगवेगळे दर मिळतात.कढीपत्त्यांला कधी 50 रुपये,40 रुपये,35 रुपये 5 किलो या प्रमाणात दर कढीपत्त्यांला मिळतो.
चौकट –
कढीपत्ताच्या विक्रीतून वर्षाला तीन ते चार लाख रुपयाचे उत्पन्न मिळतो. शेतकऱ्यांनी जर कडीपत्त्याची लागवड करावी एकदा कढीपत्ता लावला तर दहा वर्ष त्यापासून आपल्याला उत्पन्न मिळते. आणि कढीपत्त्याला मशागत जास्त असल्यामुळे काही शेतकरी कढीपत्त्याची लागवड करत नाही. शेतकऱ्यांनी कढीपत्त्याची लागवड केली तर जास्तीत जास्त उत्पन्न मिळेल असे आवाहन शेतकरी आनंद शेटे यांनी केले आहे.