सामाजिक वनीकरण विभागातील भ्रष्टाचाराला जबाबदार आधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी – वसंत देढे, जिल्हाध्यक्ष
सोलापूर – अक्कलकोट सामाजिक वनीकरण विभागातील २०१७ ते २०२४ दरम्यान झालेल्या भ्रष्टाचाराला जबाबदार असणाऱ्या संबंधित आधिकाऱ्यांची खातेनिहाय चौकशी व्हावी ह्या मागणी करिता जिल्हा परिषदेसमोर लहुजी शक्ती सेनेच्या वतीने अर्धनग्न आंदोलन करण्यात आले आहे.
अक्कलकोट तालुक्यातील सामाजिक वनीकरण विभागात सन २०१७ ते २०२४ या आर्थिक वर्षात झालेल्या विविध प्रकारच्या योजनेत कोट्यावधींचा भ्रष्टाचार झाला असल्याचा आरोप लहुजी शक्ती सेनेने केला आहे.
चौकशी समितीने केलेल्या चौकशीचीच फेर चौकशी करावी. चौकशी समितीचा केवळ बासलेगांव ते उडगी येथील रस्ता दुतर्फा, वृक्ष लागवड या चार कि.मी. रोपवनाची चौकशी करीत तपासणी केली. त्यामध्ये या परिक्षेत्रातील वनपाल यांना प्रथमदर्शनी दोषी आढळल्याचे पत्र पाठवण्यात आले. मात्र उडगी येथील एन.टी.पी.सी. सह तालुक्यातील चार एन.टी.पी.सी. बाबत चौकशीचा अहवाल प्राप्त झाला नाही.
अक्कलकोट तालुक्यातील चार एन.टी.पी.सी. त्या अंतर्गत इतर योजना यासाठी मिळालेला निधी, त्यावर खर्च झालेला तपशीलचा अहवाल दिसून येत नाही. अक्कलकोट तालुक्यात चार एन.टी.पी.एस. असून उडगी, नागणसूर, गौडगांव (खुर्द), बोरगांव (देशमुख) यापैकी कोणत्याही एन.टी.पी.सी.ची तपासणी चौकशीत झालेली नाही. त्यामुळे चौकशी समितीच्या चौकशीवरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. त्यामुळे वन संरक्षक सामाजिक वनीकरण विभाग पुणे यांनी याची अतिशय गांभीर्याने दखल घेत मनुष्यबळाची निर्मिती करीत पुन्हा एकदा फेर चौकशीची स्थापना करून या प्रकरणी संबंधित दोषी अधिकाऱ्यांची खाते निहाय चौकशी करावी. अशी मागणी लहुजी शक्ती सेनेचे जिल्हाध्यक्ष वसंत देढे यांनी केली आहे.
चौकट – एनटीपीसी अंतर्गत झालेल्या निधीमधील झालेला घोटाळा आम्हाला लेखी स्वरूपात द्यावा की, जिल्ह्यामध्ये किती झाडे लावली अक्कलकोट मध्ये किती झाडे लावली. किती झाडे लावली आणि किती जगवली तसेच आधिकारी मनीषा पाटील यांची खातेनिहाय चौकशी करावी अशी आग्रही मागणी लहुजी शक्ती सेनेच्या आंदोलनावेळी जिल्हाध्यक्ष वसंत देढे यांनी केली.