सोलापूर – ३ ते १२ ऑक्टोंबर या कालवधीत नवरात्र उत्सवात रुपाभवानी मंदिरातील देवीच्या दर्शनासाठी मोठ्या प्रमाणात भाविक पायी व वाहनाने येत असतात. मंदिराकडे जाण्यासाठी सम्राट चौक, मड्डी वस्ती क्रॉस रोड, बलिदान चौक व हैदराबाद पुणे बायपास क्रॉस रोड हे मुख्य चौक असून या चौकातून येणाऱ्या जाणाऱ्या वाहतुकीमुळे भाविकांना अडथळा निर्माण होऊन अपघात होण्याची शक्यता नाकराता येत नाही. या मार्गावर सर्व प्रकारच्या वाहनांना येण्या-जाण्यास बंदी घालण्यात येत आहे.
पोलिस खात्याची वाहने, अत्यावश्यक सेवेची व पोलिस ज्या वाहनास परवानगी देतील अशी वाहने अपवाद राहतील.
चौकट –
नवरात्रोत्सववानिमित्त रुपाभवानी मंदिराकडे येणारे रस्ते वाहतुकीसाठी दहा दिवस बंद ठेवण्यात येणार असून, वाहनधारकांनी पर्यायी मार्गाचा अवलंब करावा, असे आवाहन पोलिस आयुक्त एम.राज.कुमार यांनी केले आहे.