रेल्वे विभागात होणाऱ्या विविध घडामोडी , भ्रष्टाचार जागृती यावर झाली सखोल चर्चा
सोलापूर – रेल्वे प्रशासना संबंधीच्या प्रशासकीय कामकाज आणि कर्मचारी जनसंबंध यांच्या विषयी सोलापूर रेल्वे विभागात सतर्कता-जागरूकता सप्ताह परिसंवादाचे आयोजन करण्यात आले होते. मुख्य सतर्कता अधिकारी प्रतीक गोस्वामी ,सोलापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे,अप्पर विभागीय व्यवस्थापक अंशुमाली कुमार, मुख्य प्रकल्प अधिकारी शैलेंद्रसिंह परिहार यांच्यासमवेत उप-मुख्य सतर्कता अधिकारी, उप-मुख्य सतर्कता अधिकारी, उप-मुख्य सतर्कता अधिकारी (वाहतूक),उप-मुख्य सतर्कता अधिकारी (यांत्रिकी व भांडार) आणि उप-मुख्य सतर्कता अधिकारी आदी अधिकाऱ्यांच्या प्रमुख उपस्थित सतर्कता परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
यावेळी रेल्वे विभागात होणाऱ्या विविध घडामोडी , भ्रष्टाचार जागृती या महत्वाच्या विषयांवर सखोल चर्चा करण्यात आली.रेल्वे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी या सर्व गोष्टींपासून कसे सतर्क राहावे आणि गरज पडल्यास प्रशासकीय पातळीवर कोणत्या उपाययोजना कराव्या यांसंबंधी विशेष माहिती पॉवर पॉईंट च्या माध्यमातून उपस्थितांना सांगण्यात आली. शिवाय रेल्वे सेवा आचरणाचे नियम आणि अनुशासन यासंबंधी अधिक चर्चा करीत असताना रेल्वे कर्मचाऱ्यांच्या आयुष्यात सतर्कता आणि जागरूकता कश्या प्रकारे गरजेची आहे , यासंबंधी खुली चर्चा करण्यात आली. रेल्वे भ्रष्टाचार जागरूकता संबंधी नुक्कड नाटकाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी या नाटकाचे कौतुक करीत मुख्य सतर्कता अधिकारी (एसडीजीएम) प्रतीक गोस्वामी यांनी सदारकर्त्यांना रोख ५००० रुपयांचे बक्षीस जाहीर केले.
यावेळी वरिष्ठ विभागीय कार्मिक अधिकारी अरविंद भगत, वरिष्ठ विभागीय वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील, मुख्य चिकित्सा अधिकारी डॉ. आनंद कांबळे,वरिष्ठ विभागीय अभियंता सचिन गणेर, , वरिष्ठ विभागीय परिचालन व्यवस्थापक जे एन गुप्ता, वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रिक अभियंता( टीआरडी ) श्री. अनुभव वार्ष्णेय, वरिष्ठ विभागीय इलेक्ट्रिक अभियंता (जनरल) अभिषेक चौधरी यांच्यासह अन्य अधिकारी आणि कर्मचारी उपस्थित होते.