इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं गेल्या 25 वर्षापासून अखंड सेवा
सोलापूर – कोजागरी पौर्णिमा निमित्त महाराष्ट्राची कुलस्वामिनी तुळजापूरची तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक अनवाणी पायी चालत तुळजापूरकडे रवाना होत असतात मुखी आदिमाया शक्तीचे नाव कपाळावर कुंकवाचा मळवट आणि अनवाणी पावले एकच ध्यासाने भारावून तुळजाभवानीच्या वाटेवर कोजागिरी पौर्णिमाच्या निमित्ताने महाराष्ट्र,आंध्र, कर्नाटक, तेलंगणा यासह विविध राज्यातील लाखो भाविक सोलापूर शहरातून तुळजापूरच्या दिशेने रवाना होत असतात दरम्यान गेली 25 वर्षापासून इच्छा भगवंताची परिवाराच्या वतीनं महाप्रसादाची अखंड सेवा आज तागायत सुरू असून कोजागिरी पौर्णिमा निमित्त तुळजापूरकडे अनवाणी पायी चालत जाणाऱ्या भक्तांना लाडू,चिवडा यासह यंदाच्या वर्षी भाविकांना उन्हाचा आणि पावसाचा त्रास होऊ नये यासाठी इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे संस्थापक आणि आधारस्तंभ लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव, नगरसेवक नागेश गायकवाड आणि अनिल जाधव यांच्या नेतृत्वाखाली सोलापूर- तुळजापूर रोडवरील गणपती घाट येथे शेकडो भाविकांना छत्री आणि नॅपकिनचे वाटप करण्यात येणार आहे. शारदीय नवरात्र महोत्सवाची सांगता होताच आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी कोजागिरी पौर्णिमा निमित्त लाखो भाविक विविध परराज्यातील देवीभक्त सोलापूर मार्गे तुळजापूरकडे रवाना होत असतात यंदाच्या वर्षी वातावरणात खूप मोठे बदल झाले असून दिवसभर ऊन आणि रात्री पाऊसाचे आगमन अशी परिस्थिती निर्माण झाली आहे यामुळे भाविकांना आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी अनवाणी पायी चालत जात असताना याचा त्रास होणार आहे ही भाविकांची गैरसोय बघता भाविकांना उन्हाचा आणि पावसाचा तडाका बसू नये याची काळजी घेत यंदाच्या वर्षी इच्छा भगवंताची परिवाराचे सर्वेसर्वा संस्थापक लक्ष्मण मामा जाधव यांच्या मार्गदर्शनाने यंदाच्या वर्षी तुळजापूरला पायी चालत जाणाऱ्या भक्तांना महाप्रसादासह छत्री आणि नॅपकिनचे वाटप करण्याचा मानस असल्याचे राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समितीचे विशेष निमंत्रित सदस्य किसन जाधव म्हणाले. गेल्या पंचवीस वर्षापासून कोजागिरी पौर्णिमा निमित्त गणपती घाट येथे महाप्रसाद वाटप करण्यात येणार असून भाविकांनी याचा लाभ घ्यावा. आई तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांच्या गैरसोयी सोडवण्यासाठी इच्छा भगवंताची मित्र परिवाराचे पदाधिकारी व सदस्य हे शक्ती देवीच्या भक्तांची अखंड सेवा बजावीत असतात.