पाकिस्तानातील बलूचिस्तान मध्ये देवीचा उगम ; भावसार समाजाची कुलदेवी
सोलापूर – सोलापूरातील गणेश पेठेत हिंगुलांबिका देवीचे अत्यंत पुरातन मंदिर आहे. हिंगुलांबिका देवी माता मंदिर ट्रस्टच्या वतीने यंदाही विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. शिवाय नवरात्र उत्सवात नऊ रूपांमध्ये हिंगुलांबिका देवीचे दर्शन पाहायला मिळणार आहे.
नवरात्रीत स्थापनेपासून ते आजतागायत दर मंगळवारी, शुक्रवारी, पौर्णिमा, दुर्गाष्टमी व अमावास्येस देवीची विशेष पूजा व आरती केली जाते. हिंगुलांबिका मंदिरात अश्विन शुद्ध प्रतिपदेच्या घटस्थापनेपासून दसऱ्यापर्यंत दररोज रात्री छबीना व इतर कार्यक्रम असतात. नवरात्रीत दररोज देवीचे नऊ रंगात व नऊ मनमोहक रूपांचे दर्शन घडविले जाते. कालिका, सरस्वती, कोल्हापूरची महालक्ष्मी, तुळजाभवानी, सप्तशृंगी, महिषासूरमर्दिनी, माहूरची रेणुकामाता, सौधत्ती यलम्मा, व ललितादेवी अशा नऊ वेगवेगळ्या रूपात देवीला पाहाण्यासाठी भक्तांची मोठी गर्दी होत असते.यामुळे या काळात हा परिसर भाविकांनी गजबजलेला असतो आश्विन पौर्णिमेस वस्त्र प्रावरणाचा, आरतीचा मानाचा चढाव होऊन ३ ते ४ हजार भक्तांना देवीचा प्रसाद वाटला जातो.
————————-
यंदा नवरात्रीत हिंगुलांबिका देवीचे असे रूप पहायला मिळणार..
-३ ऑक्टोंबर रोजी, घटस्थापना दिवशी आरती आणि हिंगुलांबिका देवीचे रूप पहायला मिळणार
– ४ ऑक्टोंबर रोजी धनलक्ष्मी देवीचे रूप पहायला मिळणार
– ५ ऑक्टोंबर रोजी ब्रह्मचारिणी देवीचे रूप पहायला मिळणार आहे
– ६ ऑक्टोंबर रोजी कोल्हापूर महालक्ष्मी देवीचे रूप पहायला मिळणार आहे.
– ७ ऑक्टोंबर रोजी पद्मावती देवीचे रूप पाहायला मिळणार आहे.
-८ ऑक्टोंबर रोजी ललितांबिका देवीचे रूप पाहायला मिळणार आहे.
९ ऑक्टोंबर रोजी सरस्वती देवीचे रूप पहायला मिळणार आहे.
१० ऑक्टोंबर रोजी सप्तशृंगी देवीचे रूप पहायला मिळणार आहे.
११ ऑक्टोंबर रोजी महिषासूरमर्दिनी देवीचे रूप पहायला मिळणार आहे.
——————
कोट…
ह्या देवीचा उगम पाकिस्तानातील बलूचिस्तान मध्ये झाला आहे. अतिशय जागृत आणि नवसाला पावणारी देवी अशी हिंगुलांबिका देवीची ख्याती आहे. त्यामुळे देवीला मोठ्या प्रमाणावर नवस मागितला जातो. नवरात्रीच्या कालावधीमध्ये नवस फेडण्यासाठी व नवरात्रीतील देवीचे नऊ विलोभनीय रूपे पाहण्यासाठी भक्तांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. तरी देवी भक्तांनी नऊ रुपांचे दर्शन घ्यावे. महिलांसाठी दर्शन रांगेची वेगळी सोय करण्यात आली आहे.
नवरात्र उत्सव समिती अध्यक्ष- द्वारकाधिश क्षीरसागर
नऊ दिवस मंदिरातील रोजच्या विधिवत पूजा –
१ पहाटे साडे पाच वाजता होते काकडा आरती
२ सकाळी आठच्या दरम्यान महाभिषेक आणि महाअलंकार पूजा
३ सकाळी ८ च्या दरम्यान महाआरती
४ सकाळी ११:३० वाजता आरती
५ सायंकाळी ६ ते ७ दरम्यान होमहवन
६ रात्री ८:३० वाजता छबीना मिरवणूक