World Cup 2024 –
World Cup 2024 भारतीय संघाने टी20 वर्ल्डकप 2024 जिंकताच विराट कोहलीने (Virat Kohli) कोट्यवधी चाहत्यांना धक्का दिला आहे. विराटने सामन्यानंतर हा आपला अखेरचा टी20 वर्ल्डकप असून आपण निवृत्त होत असल्याचे सांगितले आहे.
हा माझा शेवटचा T20 वर्ल्ड कप आहे. हेच आहे जे आम्हाला मिळवायचे होते. आम्हाला ही ट्रॉफी उंचवायची होती. हे एक ओपन सिक्रेट होते. हे असं नाहीये की, आम्ही जर हरलो असतो, तर मी घोषित केले नसते. हे ठरलेलं होतं. आता पुढच्या पिढीने T20 क्रिकेट पुढे नेण्याची वेळ आहे आणि चमत्कार घडवण्याची वेळ आहे, जे आम्ही IPL मध्ये पाहिले आहे. मला यात काहीच शंका नाही, ते तिरंगा उंच फडकावतील. अशी भावना विराट कोहली ने व्यक्त केली