Pune News –
कल्याणी नगरमधील अपघात प्रकरण ताजे असतानाच वानवडी येथे १४ वर्षांच्या मुलाने भरधाव वेगाने पाण्याच्या टँकर चालवला.
या पाण्याच्या टँकरची धडक बसल्याने एका महिलेसह दोन मुली जखमी झाल्या. वानवडी येथे सकाळी सहा साडेसहा वाजता ही दुर्घटना घडली.
नागरिकांनी टँकर अडवला आणि टँकरचालक मुलाला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले. संबंधित मुलगा भरधाव वेगाने टँकर घेऊन चालला होता. वानवडी येथे दुचाकीवरून कुस्ती प्रशिक्षक संतोष ढुमे आणि त्यांची पत्नी जात होती.
त्यांच्या तालमीत शिकणाऱ्या मुली धावण्याचा सराव करत होत्या. त्यादरम्यान टँकरने दुचाकीला धडक दिली.
त्यांची पत्नी दुचाकीवरून रस्त्यावर पडली. टँकरखाली दोन मुली आल्या.
त्यानंतर ढुमे यांनी या मुलींना बाहेर काढले. नागरिकांनी अल्पवयीन मुलाला पकडून पोलीसांच्या ताब्यात दिले आहे.