T20 World cup 2024 – टी-२० वर्ल्ड कप फायनलमध्ये निर्णायक खेळी करून सामनावीराचा किताब पटकावणाऱ्या विराटने सामन्यानंतर हा माझा शेवटचा टी-२० वर्ल्ड कप होता असं म्हणत निवृत्तीची घोषणा केली होती. विराटच्या या निर्णयानंतर कर्णधार रोहित शर्मानेदेखील टी-२० मधून निवृत्तीची घोषणा केली आहे. विराट आणि रोहित यांच्या या निर्णयाने चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे. (Rohit Sharma – Virat Kohli T20 Retirment )
2007 साली वेस्ट इंडीजमध्येच वन डे वर्ल्ड कपमध्ये राहुल द्रविडच्या नेतृत्त्वाखाली खेळताना भारताचा दारूण पराभव झाला होता. खेळाडू म्हणून आपल्या कारकीर्दीत द्रविडला कधी विश्वचषक जिंकता आला नाही, पण टीम इंडियाचा प्रशिक्षक म्हणून द्रविडच्या इनिंगची अखेर विश्वचषकाच्या ट्रॉफीसह झाली.
Virat Kohli – हा माझा शेवटचा टी20 सामना होता. आम्हाला हेच मिळवायचं होतं. आयसीसी स्पर्धा जिंकण्यासाठी आम्ही बराच काळ वाट पाहिली आहे. ते स्वप्न पूर्ण झालं. आता तरुणांना संधी देण्याची वेळ आली आहे.”
Rohit Sharma – माझाही हा अखेरचा टी20 सामना होता. मी या फॉरमॅटमध्ये खेळू लागलो तेव्हापासून आनंद लुटला आहे, यातून निवृत्तीची यापेक्षा चांगली वेळ नाही. मी भारतासाठी खेळायला सुरुवात टी20 मध्येच केली, मला हा वर्ल्ड कप जिंकायचा होता.