Solapur News |
सोलापूर प्रतिनिधी : शहरातील विविध भागातून
चोऱ्या, घरफोड्या, बाईक चोरणाऱ्या सात जणांना सदर बझार डीबी पथकाने सापळा लावून अटक केली. त्यांना अटक करून ११ गुन्हे उघडकीस आणले. यात सात बाईक, मोबाईल, लॅपटॉप अशा ५ लाख ६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
राम सिद्राम माढेकर (वय ४०, सतनाम चौक, सोलापूर), प्रफुल्ल नंदकिशोर डोलारे (वय २४, रा. शास्त्रीनगर, सोलापूर), करण उर्फ सुमित श्रीनिवास मिसालोलू (वय २१ रा. उत्तर सदर बझार, सोलापूर), मनीषा ईशा भोसले (वय २४, रा. श्रीगोंदा, जि. अहमदनगर), जयराज भीमण्णा वर्जन (वय ३०, मोदी, सोलापूर), गणेश किशन गायकवाड (वय ३६, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी, सोलापूर), राहुल बाळासाहेब जाधव (वय २८, कैकाडी गल्ली, बाळीवेस सोलापूर), विल्सन विजय विटेकर (वय २१, रा.जगजीवनराम झोपडपट्टी, सोलापूर) अशा अटक केलेल्या आठ जणांचा समावेश आहे.
शहरातील वाढत्या चोऱ्यांच्या तपासासाठी सदर बझार डीबी पथकाकडून शोधमोहीम सुरू असताना ४ जून रोजी रात्री मार्केट यार्डाजवळ तिघांनी अडवून चालकाला मारहाण करून १५ हजार रुपयांची रोकड व मोबाईल चोरला होता. रेकॉर्ड तपासून तिघांकडून दुचाकीसह ६६ हजारांचा मुद्देमाल जप्त केला.
ही कामगिरी पोलिस आयुक्त एम. राज कुमार, पोलिस उपायुक्त विजय कबाडे, सहा. पोलिस आयुक्त अजय परमार, वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजित लकडे, भालचंद्र ढवळे यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकातील फौजदार नितीन शिंदे, अनिता जाधव, सहा. फौजदार औदुंबर आटोळे, हवालदार संतोष मोरे, शहाजहान मुलाणी, राजेश चव्हाण, संतोष पापडे, महेश जाधव, सागर सरतापे, लक्ष्मीकांत फुटाणे, मल्लू बिराजदार आदींनी केली.
मोदीखाना येथील निर्मिती अपार्टमेंटमध्ये घरफोडी करणाऱ्या मनीषा ईषा भोसले या आरोपीला सीसीटीव्ही फुटेजच्या साहाय्याने माग काढून तिने चोरलेला ६५ हजार रुपयांचा लॅपटॉप जप्त करण्यात आला. अन्य गुन्ह्यातील तीन मोबाईल, सात बाईक जप्त करण्यात आल्या.