Solapur Laksmi Shinde Story ; जन्मतःच दोन्ही हात गमावूनही सोलापूरच्या ‘लक्ष्मी’ची उत्तुंग भरारी
सोलापूर – सोलापुरातील असणाऱ्या दिव्यांग तरुणी लक्ष्मी शिंदे हिला जन्मतः दोन्ही हात नसूनही पायांनाच हात बनवून लक्ष्मी हाताळते फोन, लॅपटॉप, लक्ष्मीने रायटर न वापरता पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. आता पुढे ती स्पर्धा परीक्षा देत आहे, लक्ष्मीचे कलेक्टर होण्याचे स्वप्न आहे.
संघर्ष हा प्रत्येकाच्या आयुष्यात असतो पण जो कितीही संघर्ष असला तरी संकटांवर मात करून जो आयुष्य आनंद जगता आले पाहिजे. एकीकडे काही लोक सर्व काही असूनही संसाराच्या छोट्या-छोट्या समस्यांमुळे आपल्या आयुष्याला कंटाळतात तर दुसरीकडे असे काही लोक आहेत जे अनेक संकटाचा सामना देऊनही आयुष्य आनंदाने जगतात. असे लोक आयुष्य जगण्याची वेगळी व्याख्या तयार करतात लोकांना प्रेरणा देतात.
जन्मत:च दोन्ही हात नसताना देखील पायाने पेपर सोडवून सोलापूरच्या लक्ष्मी शिंदे रायटर न वापरता पदवी शिक्षण पूर्ण केले आहे. आता पुढे ती स्पर्धा परीक्षा देत आहे, लक्ष्मीचे कलेक्टर होण्याचे स्वप्न आहे. स्पर्धा परिक्षाच अभ्यास चालू आहे त्याच सोबत B प्लॅन म्हणून लक्ष्मी पायाने पेटिंग करते. तिच्या पेन्टिंग Switzerland ला गेले आहेत, तिथे तिझा प्रवेश झाला आहे.
तिला पोटात असतानाच पाडणार होते पण…
लक्ष्मी पोटात असतानाच डॉक्टरांनी तिला दोन्ही हात नाहीत, याची कल्पना दिली होती. त्याचबरोबर गर्भ काढण्याचा सल्ला तिच्या आई- वडिलांना दिला होता, नातेवाईकांनी सुद्धा विरोध केला, त्यावर ‘ही मुलगी मला देवानं दिलेलं गिफ्ट आहे. मी ते नाकारणार नाही. ती जशी आहे तशी मला हवीय,’ असं वडिलांनी सांगितल्याचा अनुभव लक्ष्मीनं सांगितला आहे.
कोणत्याही परीक्षेत रायटर न वापरता पदवी पर्यंतचे शिक्षण केले पूर्ण –
परीक्षा लक्ष्मीचे वडिल रिक्षाचालक असून आई गृहिणी आहे. त्यांनी मला स्वत:च्या पायावर उभं केलंय. आई वडिलांच्या प्रोत्सहनामुळेच मी BA पर्यंतचं शिक्षण पूर्ण केलंय. त्याचबरोबर आजवर कोणत्याही परीक्षेला रायटर वापरला नाही. सध्या ती स्पर्धा परीक्षेची तयारी करत आहे, तिचं IAS होण्याचे स्वप्न आहे. पुढील उच्च शिक्षणासाठी ती मुंबई ला गेली असता, तिची राहण्याची सोय होत नव्हती. ओळखीच्या शिक्षकाने आ. अतुल भातखळकर यांच्याशी संपर्क साधला आणि त्यांनी त्वरित लक्ष्मी शिंदेच्या राहण्याची सोय केली.
पायांनाच हात बनवून दिव्यांग लक्ष्मी हाताळते लॅपटॉप, काढते रांगोळी, पेंटिंग, मेहंदी –
जन्मत:च दोन्ही हात नसताना देखील पायाने हाताळते फ़ोन, लॅपटॉप एवढेच नव्हे तर लक्ष्मी पायाने पेंटिंग,रांगोळी, मेहंदी अगदी सुरेख काढते. तसेच पायानेच चंद्रा सारखी गोल पोळी बनवते. आयुष्य जगण्याची वेगळी व्याख्या लक्ष्मी ने समाजासमोर तयार करत लोकांना प्रेरणा देण्याचे काम केले आहे.
सोलापूरच्या लक्ष्मी च्या पेंटिंग जातात स्विझर्लंड ला –
लहानपणापासूनच कलेक्टर होण्याचे स्वप्न होते, पदवी शिक्षण पूर्ण केल्यानंतर स्पर्धा परीक्षा देण्यास सुरुवात केली. परंतु लक्ष्मीचा बी प्लॅन तयार होता. तिने पेंटिंग काढण्यास सुरुवात केली आणि त्या पेंटिंग ला मागणी वाढत गेली. तिच्या पेंटिंग्स बाहेर देशात जातात, आणि त्यात यश प्राप्त झाले आहे तरी सोबत स्पर्धा परिक्षाच ती सध्या अभ्यास करतेय.
आईच्या पोटात असताना सोनोग्राफी केली तेव्हा समजल मुलगी आहे . आणि तिला दोन्ही हात नाहीत. नातेवाईकांचा खूप विरोध होता , तरी आई वडिलांनी मला समाजात आणले . मला चालता पण येत नव्हत, आईवडिलांनी मालिश करून मला चालायला शिकवले , मला शाळेत पण प्रवेश मिळत नव्हता, आईवडिलांनी जबाबदारी घेतली. वडिल रिक्षाचालक, आई घर काम मला बहिणी व एक भाऊ आहेत . नातेवाईकांचा , समाजाचा विरोध असताना ही त्यांनी मला या जगात आणले . माझ्या प्रत्येक पावलांवर, आई उजवा तर वडिल डावा हात बनत राहिले. आज जे काही आहे तेफक्त आईवडिलांकडे मुळे अशी भावना लक्ष्मी शिंदे हिने व्यक्त केली आहे.
⁃ लक्ष्मी शिंदे, दिव्यांग तरुणी