सोलापूर महानगरपालिका सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी यांच्या समवेत बैठक
सोलापूर,सोलापूर महानगरपालिकेचे सहाय्यक अभियंता प्रकाश दिवाणजी यांच्या समवेत झालेल्या एका महत्त्वपूर्ण बैठकीत सोलापूर विकास मंचच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे अनेक महत्त्वपूर्ण प्रकल्प मार्गी लागण्याच्या दृष्टीने निर्णय घेण्यात आले.
छत्रपती संभाजी महाराज चौक ते सीएनएस हॉस्पिटलपर्यंत ५४ मीटर रुंदीचा रस्ता लवकरच साकार होणार आहे. या कामासाठी ०३ कोटी ८२ लाख रुपयांची निविदा लवकरच निघणार असून, सोलापूर विकास मंचच्या पाठपुराव्यामुळे DPDC मधून या कामासाठी तब्बल भरिव निधीची तरतूद करण्यात आली आहे.
यावेळी हद्दवाढ व अवाढव्य टॅक्सवर चर्चा करण्यात आली.
शहराच्या हद्दवाढीबाबत तसेच शहरवासीयांवर लादल्या जाणाऱ्या अवाढव्य टॅक्सच्या मुद्द्यावर नगर विकास विभाग, पालकमंत्री व आयुक्त यांच्यासोबत बैठक लवकरच आयोजित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे.
या बैठकीत सोलापूर विकास मंचचे सदस्य मिलिंद भोसले, योगिन गुर्जर, अॅड. दत्तात्रय अंबुरे, सतिश शेंडे, विजय कुंदन जाधव आदी मान्यवर उपस्थित होते.
वाहतूक सुरळीत होण्याचा मार्ग
हा रस्ता वाहतुकीसाठी खुला झाल्यावर १०२ वर्षे जुना दमाणी नगर पुल पाडल्यानंतर होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मात करता येईल. अप्रोचेसचे एम्बॅकमेंट भराव, खडीकरणाचे दोन स्तर, BUSG व BM च्या दोन स्तरांचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा महानगरपालिकेचा मानस आहे.