सोलापूर प्रतिनिधी –
टिव्ही पाहण्यात मग्न असलेल्या कुटुंबाचा घरात घुसलेल्या घोणस सापाला पाहताच उडाला गोंधळ, WCAS ने सापाला रेस्क्यू करून दिला दिलासा
सोलापूर :- बुधवार 3 जुलै २०२४ रोजी रात्री १०.३० च्या सुमारास शिवाजी नगर, बाळे येथील रहिवासी सार्थक आगावणे यांच्या घरातील सदस्य जेवण आटोपून अंथरुणावर टीव्ही बघत बसले होते व झोपण्याच्या तयारीत होते. आगावणे हे घराचा मुख्य दरवाजा बंद करण्यासाठी उठले असता घोणस जातीचा विषारी साप दडून बसलेला दिसून आला. त्यांनी लगेच याची माहिती WCAS चे सुरेश क्षीरसागर यांना फोनवरून कळविली. कार्यतत्पर असणारे क्षीरसागर यांनी लगेचच घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली असता त्यांना दरवाजाच्या पाठीमागे साधारण 4 ते 4.5 फुट लांबीचा घोणस जातीचा विषारी साप आढळून आला.
🛑 WCAS चे क्षीरसागर यांनी सावधानतेने सुरुवातीला त्या सापाला हात न लावता एका PVC पाईपमध्ये सुरक्षितरित्या रेस्क्यू केले. त्यानंतर घरातील सर्व सदस्यांनी सुटकेचा श्वास घेतला.
🛑 WCAS चे क्षीरसागर यांनी त्या घोणस प्रजातीच्या विषारी सापाची विनायक आगावणे कुटूंबाला अभ्यासपूर्ण माहिती दिली. आगावणे कुटुंबाने त्यांच्या कार्याचे कौतुक केले. या बचाव कार्यामध्ये सुरेश क्षीरसागर व लखन भोगे व सैपन मुजावर यांनी सहभाग घेतला.