Man Marathi News Newtwork,
सोलापूर –
येथील ब्राह्मण समाज सेवा संघाच्या वतीने ब्राह्मण समाजातील गुणवंत होतकरू गरीब आणि गरजू मुलांना शिष्यवृत्ती दिली जाणार आहे. यासाठी ब्राह्मण समाजातील गुणवंत, गरजू विद्यार्थ्यांनी अर्ज करावेत असे आवाहन सेवा संघाच्या वतीने करण्यात आले आहे.
गेल्या अनेक वर्षापासून ब्राह्मण समाज सेवा संघातर्फे हा उपक्रम राबविला जात आहे त्याप्रमाणे यावर्षीही हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. तरी ब्राह्मण समाजातील दहावी उत्तीर्ण आणि त्यापुढे कोणत्याही इयत्तेचे शिक्षण घेणाऱ्या गरजू, गरीब, गुणवंत विद्यार्थ्यांनी संस्थेच्या डफरीन चौकातील आदर्श मंगल कार्यालयामध्ये असलेल्या कार्यालयात आपला अर्ज दाखल करावा. विहित नमुन्यातील अर्ज संस्थेच्या कार्यालयात उपलब्ध आहे. तसेच अधिक माहितीसाठी (9822684192) या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन ब्राह्मण सेवा संघाच्या संचालक मंडळांने केले आहे.