सोलापूर प्रतिनिधी / बनावट सोने गहाण ठेवून बँकेची सुमारे 86 लाख रुपयाची फसवणूक केल्याप्रकरणी तिघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर = अॅड. रियाज एन. शेख Adv. Riyaj N. Shaikh
सोलापूर शहरांमधील कॅनरा बँकेच्या विविध शाखा मध्ये दिनांक १ फेब्रुवारी 2024 ते 28 में 2024 या कालावधीमध्ये कॅनरा बँकेच्या सोने मूल्यमापन करणारे सोनार सुनील नारायण वेदपाठक यांच्याशी 13 जणांनी संगणमत करून एकूण 2255 ग्रॅम बनावट सोने तारण ठेवून बँकेची 85 लाख 93 हजार 300 इतक्या रकमेची कर्ज घेऊन फसवणूक केल्याप्रकरणी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे दिनांक 13/06/2024 रोजी दाखल झालेल्या गुन्ह्यामध्ये सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री पी.एस. खुणे यांनी आरोपींना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे.
यात घटनेची थोडक्यात हाकिकत अशी की,
फिर्यादी अनिल कुमार बालाजी शहापूरवाड रा. विजापूर रोड सोलापूर हे कॅनरा बँक, चाटी गल्ली, सोलापूर येथील बँकेचे चीफ मॅनेजर असून कॅनरा बँकेचे सोलापूर शहरांमध्ये एकूण ४ शाखा आहेत त्या ४ शाखांमध्ये सोने तारण कर्ज देण्याची सुविधा असून सदर सुविधा घेण्याकरिता आरोपींनी कर्ज मागणी अर्ज केला व त्यानंतर गहाण ठेवणारे सोने हे बँकेचे नेमलेले सोनार सुनील नारायण वेदपाठक यांच्याकडून तपासून घेऊन त्याचे मूल्यांकन करून सदर मूल्यांकनाच्या आधारे एकूण 13 खातेदारांना विविध शाखांच्यामार्फत 24 तारण कर्ज प्रकरण मंजूर करून बँकेने एकूण 85 लाख 93 हजार 300 इतक्या रकमेचे कर्ज दिले. सदर तारण ठेवलेले सोने याची फेर तपासणी केली असता सदरचे सोने हे बनावट असल्याचे दिसून आल्याने व बँकेची बनावट मूल्यांकन कागदपत्र व बनावट सोने गहाण ठेवून फसवणूक केल्याचे फसवणूक केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांनी दिनांक १३ जून 2024 रोजी जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे फिर्याद दिली होती. सदर दिलेल्या फिर्यादीवरून जोडभावी पेठ पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर नंबर 320/ 2024 भादवि कलम 406, 409, 420, 467, 468, 471, 34 अन्वय एकूण 14 आरोपींच्या विरुद्ध संगणमत करून फसवणूक केल्याचा गुन्हा दाखल झाला होता. सदर गुन्ह्याचा तपास हा आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस उपनिरीक्षक मोहन व्ही पवार यांच्याकडे देण्यात आलेला होता.
सदर दाखल गुन्ह्यामध्ये आरोपी नामे जुबेर जगरीस मुल्ला, मुबारक जैनुद्दीन शेख, कदीर मलिक पठाण सर्व राहणार शेळगी सोलापूर यांचे नाव आल्याने त्यांनी अॅड. रियाज एन. शेख यांच्या वतीने नुकत्याच लागू झालेल्या भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या नवीन कायद्याच्या कलम 482 अन्वय अटकपूर्व जामीन अर्ज सोलापूर येथील सत्र न्यायालयामध्ये सादर केला होता. सदर जामीन अर्जामध्ये आरोपींच्या वतीने अंतरिम जामीन मिळण्याकरिता अॅड. रियाज एन. शेख यांनी युक्तिवाद केला. सदर युक्तिवाद वेळी आरोपींनी गहाण ठेवलेले सोने हे बनावट नसून पूर्णपणे ओरिजनल आहे, बँकेच्या कर्मचान्यांनी परस्पर सदरच्या सोन्यामध्ये फेरफार केल्याची शक्यता नाकारता येत नाही, सोन्याचे तारण ठेवण्यापूर्वी मूल्यांकन करणारे इसम व त्याची खात्री पटवणारे इसम हे बँकेचे अधिकारी व कर्मचारी असून त्यामध्ये आरोपींचा कोणताही हस्तक्षेप नाही त्यामुळे आरोपींनी कोणताही गुन्हा केलेला प्रथमदर्शनी दिसून येत नाही, आरोपींच्या विरुद्ध खोटा गुन्हा दाखल केलेला आहे, आरोपी हे सोलापूरचे रहिवासी असून ते तपासकामी सहकार्य करण्यास तयार आहेत, असा युक्तिवाद केला सदरचा युक्तिवाद ग्राह्य धरून सोलापूर येथील सत्र न्यायाधीश श्री पी.एस. खुणे यांनी आरोपी नामे जुबेर जगरीस मुल्ला, मुबारक जैनुद्दीन शेख, कदीर मलिक पठाण सर्व राहणार शेळगी सोलापूर या तिघांना अंतरिम अटकपूर्व जामीन मंजूर केला.
सदर प्रकरणांमध्ये आरोपी कर्जदार यांच्यातर्फे अॅड. रियाज एन. शेख, अॅड. अंजली बाबरे, अॅड. अजय राठोड यांनी काम पाहिले