सोलापूर प्रतिनिधी –
तंत्रज्ञानाच्या या युगात प्रत्येकालाच टेक्नो-फ्रेंडली बनायचे आहे. हि गोष्ट जरी चांगली असली तरी तिचे तितकेच दुरुपयोग सुद्धा आहेत. पालकांना आपल्या पाल्याचा हट्ट न पुरवणे हे चांगलेच भोवले आहे.
या प्रकरणात घडलेला प्रसंग असा कि, प्रत्येक वेळी रडून,भांडून घरचे आपल्याला मोबाईल घेऊन देत नाहीत म्हणल्यावर घरातून पलायन करण्याच्या हेतूने दहावीत शिकणारा जेमतेम 16 वर्षाच्या त्याने थेट रेल्वे स्टेशन चा रस्ता धरला. सोलापूर रेल्वे स्थानकावरून तो थेट मुंबईकडे जाणाऱ्या उद्यान मध्ये चढला.आपले आई-बाबा आपला हट्ट पुरवीत नाहीत ते फक्त आपल्याला बंधनात बांधतात . हा एकच विचार त्याच्या डोक्यात होता.परंतु रेल्वे ची तितकी माहिती नसल्याने याला कोणत्या डब्यात चढायचे आणि तिकीट चेकिंग करताना काय सांगायचे ? याची माहिती नसल्याने तो पहिला AC कोच मध्ये चढला.त्यानंतर तिथे तिकीट निरीक्षकाला पाहता क्षणी तो स्लीपर कोच मध्ये गेला. सोलापूर रेल्वे विभागातील, तिकीट निरीक्षक श्री. गौतम बनसोडे यांनी त्याला रेल्वे स्थानकावरच रेल्वे मध्ये चढताना पहिले होते. श्री.बनसोडे यांनी त्याचा मागोवा घेतला. सुरुवातीला तो काही सांगण्यास तयार नव्हता. नंतर त्याने, त्याचे आई-बाबा त्याला मोबाईल घेऊन देत नाहीत म्हणून तो घरातून पळून आल्याचे सांगितले. तात्काळ सर्व प्रकार कंट्रोल ला सांगितला आणि कुर्डुवाडी रेल्वे स्थानकावर आरपीएफ च्या जवानांच्या स्वाधीन केले.त्यानंतर आरपीएफ च्या जवानांनी त्याच्याकडून त्याच्या पालकांचा मोबाईल नंबर घेऊन त्यांच्याशी संपर्क साधला.
आरपीएफ च्या जवानांनी घडलेली संपूर्ण घटना त्याच्या कुटूंबियांना सांगितली.कुटूंबियांच्या उपस्थितीत आरपीएफ जवानांनी त्याची समजूत काढली आणि त्याच्या घरच्यांच्या हाती सुखरूप सुपूर्द केले. रेल्वे कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे त्यांचा मुलगा सुखरूप असल्याची भावना त्या मुलाच्या घरच्यांनी बोलून दाखविली. वायफळ हट्ट हा आपल्या कुटुंबीयांची शांताता भंग करणारा असतो हेच या प्रकरणातून शिकण्यासारखे आहे.