सूरज कोणालाच नाही भीत, आपल्या युनिक स्टाईलने गोलीगत होणार टॉपचा किंग!
Bigg Boss Marathi New Season Day 5* : मराठी मनोरंजनाचा बॉस अर्थात ‘बिग बॉस मराठी’चा दिमाखदार नवा सीझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. यंदाच्या पर्वात एकापेक्षा एक अवली सदस्य सहभागी झाले आहेत. त्यातीलच एक चर्चेत असणारं नाव म्हणजे गोलीगत सूरज चव्हाण. सोशल मीडियाच्या माध्यमातून चर्चेत असणारा सूरज चव्हाणने विशेष प्रेक्षकांना विशेष स्टाईलने प्रेक्षकांना आपलंसं केलंय. पण आता मात्र तो कोणालाही न घाबरता आपल्या स्टाईलने सर्वांना गोलीगत चीत करताना दिसून येणार आहे.
‘बिग बॉस मराठी’चा नवा सीझन नेटकऱ्यांच्या चांगलाच पसंतीस उतरला आहे. या प्रोमोमध्ये सूरज निक्की तांबोळीला चॅलेंज करताना दिसून येत आहे. त्यावर निक्की तांबोळी सूरजला म्हणते,”तू मला चॅलेंज करतोस ना…तू विचार पण करू शकत नाही की तू माझं असं रुप पाहशील”. त्यानंतर कन्फेशन रुममध्ये ‘बिग बॉस’ सूरजला म्हणतात,”सूरज न घाबरता खेळा”. त्यानंतर सूरज म्हणताना दिसतोय,”आता मी नसतो कोणाला भीत… कारण मी आहे गोलीगत टॉपचा किंग”.
गोलीगतचा प्रोमो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. तू लढ भावा, ज्यांनी केला सूरजचा नाद त्यांना तो करणार गोलीगत बाद, आपला भाऊ गोलीगत, नड तू, अशा कमेंट्स करत सूरजचे चाहते आणि नेटकरी त्याला चांगलच सपोर्ट करताना दिसत आहेत. गोलीगतची नवी स्टाईल नक्की कशी असेल, नव्या खेळीने तो नक्की काय करणार हे जाणून घेण्याची चाहत्यांना आता उत्सुकता लागली आहे.