Bigg Boss Marathi / Ritesh Deshmukh Colours Marathi –
प्रतिनिधी –
कलर्स मराठीच्या ‘रमा राघव’ या मालिकेत राघवची मुख्य भूमिका साकारून प्रेक्षकांची मने जिंकणारा निखिल दामले आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धमाका करायला सज्ज झाला आहे. पुण्याचा हा गुणी अभिनेता नेहमीच आपल्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांना भुरळ पाडत आला आहे आणि आता ‘बिग बॉस’च्या घरात तो आपल्या अनोख्या अंदाजात प्रेक्षकांचे मनोरंजन करायला आला आहे.
मालिका आणि ‘बिग बॉस’मधील प्रवासबद्दल निखिल म्हणाला,”मालिका आणि ‘बिग बॉस’मधील प्रवास सारखाच वाटतो. माझ्या मते मालिकेतही हिरो आणि खलनायक असतात आणि तसंच ‘बिग बॉस’च्या घरातही हिरो आणि खलनायक असतात. त्यामुळे हा प्रवास मला खूप समान वाटतो. जेव्हा मी माझ्या घरच्यांना बिग बॉस बद्दल सांगितले तेव्हा त्यांना माझा खूप अभिमान वाटला आणि ते ‘बिग बॉस’ मध्ये मला पाहायला खूप उत्साहित आहेत. माझी आई तशी बिग बॉसची खूप मोठी फॅन आहे, तर कामामुळे बाबांना फारसा वेळ मिळत नाही. तरी ते दोघेही खूप उत्सुक आहेत. घरातल्या कामाबद्दल बोलायचे झाले तर.. मला भांडी घासायला कंटाळा येतो. जेवणाबद्दल सांगायचे तर मला जास्त बनवता येत नाही पण बाकी सगळी कामे करायला मला आवडेल”.
निखिल पुढे म्हणाला की ,”माझ्या मित्रांना जेव्हा समजले तेव्हा त्यांनी मला सल्ला दिला की, तू जसा बाहेर आहे तसाच घरातही राहा.. कारण तेवढंच पुरेसं आहे तुला बिग बॉसची ट्रॉफी जिंकायला. घरात जाण्याआधी मी शेवटचा कॉल माझ्या घरच्यांना केला. कारण पहिल्यांदाच मी 100 दिवस त्यांच्यापासून लांब राहणार आहे.. पण माझे काही निश्चित विचार आहेत. “जो माझ्याशी नीट आहे त्याच्याशी मी नीट राहीन, पण कोणी वाकड्यात गेले तर मग मी पण थांबणार नाही,” असे निखिलने स्पष्ट सांगितले आहे.
‘बिग बॉस मराठी’मध्ये निखिल दामलेच्या प्रवासाबद्दल प्रेक्षकांना खूप उत्सुकता आहे. त्याच्या या नव्या आव्हानात्मक प्रवासात तो काय नवे रंग दाखवणार आणि कसे रसिकांचे मनोरंजन करणार, हे पाहाणे खूपच रोचक ठरणार ठरेल. निखिलच्या चाहत्यांनी त्याला शुभेच्छा देण्यासाठी सज्ज व्हायला हवे, कारण पुण्याचा हा मराठामोळा मुलगा निखिल दामले आता ‘बिग बॉस मराठी’च्या घरात धमाका करणार हे नक्कीच!